पोटनिवडणूकांच्या प्रचारात सोनूच्या चालीवरील गाणी

0
1137
पणजी आणि वाळपई मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत प्रचारासाठी महाराष्ट्रात प्रसिद्ध झालेल्या सोनूच्या गाण्याचा वापर केला जात आहे.यातील बहुतेक गाणी मुख्यमंत्री तथा पणजीचे भाजपचे उमेदवार मनोहर पर्रिकर यांना टार्गेट करणारी आहेत.
पणजी मतदारसंघातून काँग्रेसतर्फे निवडणूक लढवत असलेल्या गिरीश चोडणकर यांचे मित्र संगीतकार सिद्धनाथ बुयाव यांनी आज पर्रिकर यांना टार्गेट करत पणजे तुका भाईचेर(मनोहर पर्रिकर ) भरोसो नाय काय?अशा आशयाचे गीत सोनूच्या चालीवर प्रचार गीत तयार करून ते व्हायरल केले आहे.बुयाव यांनी या गाण्याचे चित्रीकरण मीरामार येथील किनाऱ्यावर रुतलेल्या लकी 7 या कॅसिनो बोटीसमोर करून कॅसिनोच्या विषयावर प्रकाशझोत टाकण्याचा प्रयत्न केला आहे.बुयाव हे पर्रिकर यांचे नातेवाईक असल्याने या गाण्याची सगळीकडे चर्चा सुरु झाली आहे.
गोवा सुरक्षा मंचने देखील प्रचाराचा भाग म्हणून कॅसीनोंसमोर निदर्शने करताना पर्रिकर यांच्यावर नेम साधत मन्नू तुझ्यावर आमचा भरोसा नाय हाय असे गाणे निदर्शने करताना सादर केले होते.
#पर्रिकरांच्या जावयाचा काँग्रेसच्या चोडणकरांसाठी प्रचार
गोंय शाहीर उल्हास बुयांव यांचा सुपुत्र तथा प्रसिद्ध गायक आणि संगीतकार सिद्धनाथ बुयांव हे काँग्रेससाठी गिरीश चोडणकर यांच्या प्रचाराची धुरा सांभाळत आहेत.फेब्रुवारी मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत सिद्धनाथ बुयांव यांनीच काँग्रेसच्या प्रचाराची धुरा सांभाळली होती.त्यांनी प्रचार नियोजना बरोबर लक्षवेधी प्रचार गीते तयार करून काँग्रेसची भूमिका जास्तीत लोकांपर्यंत पोचवली होती.काँग्रेसला त्याचा फायदा झाला होता.काँग्रेसच्या आमदरांची संख्या 9 वरुन 17 वर गेली होती.
पणजीच्या पोटनिवडणुकीत बुयांव यांच्याकडे प्रचाराची धुरा सोपवण्यात आली आहे.बुयांव यांनी काँग्रेसच्या प्रचारासाठी तयार केलेल्या प्रचार ओडियो गीताचे नुकतेच लॉन्चिंग करण्यात आले आहे.
बुयांव यांची पत्नी पल्लवी बुयांव ही मूळची पर्रीकर आहे.त्यांचे वडील सुभाष पर्रिकर आणि मनोहर  पर्रिकर यांचे सख्खे चुलत भाऊ आहेत.बुयांव हे पर्रिकर यांच्या विरोधात देखील विधानसभा निवडणुकी प्रमाणे सर्व ताकद पणाला लावतात का याकडे सगळ्याचे लक्ष लागून राहिले आहे.
https://www.youtube.com/watch?v=L7xwZpQ_46Y
https://www.youtube.com/watch?v=CTB7PubmDw0