पोकर स्पोर्टस लीग’चा दुसरा हंगाम (सीझन) दणक्यात सुरू!

0
1570

 

    गोवा खबर: जिची बरीच प्रतीक्षा होत होती त्या ‘पोकर स्पोर्टस लीग’च्या (२०१८) अंतिम स्पर्धेला बुधवारी (९ मे) गोव्यात ‘डेल्टिन रोयेल’मधे प्रारंभ झाला. परंतु पोकरच्या उत्साही चाहत्यांच्या पदरात फारसे काही पडले नाही असे वाटले.

 

क्रीडारसिकांना आकर्षून घेण्यासाठी ‘पीएसएल’चा हा दुसरा हंगाम सुरू झाला आहे. प्रत्येक मिनिटाला खेळाचे स्वरूप बदलणारी ही स्पर्धा येत्या १३ मेपर्यंत प्रेक्षकांची उत्कंठा वाढवेल. या स्पर्धेत संपूर्ण जगभरातील स्पर्धक सहभागी झाले असल्याने आधीपासूनच लीगचे बरेच चाहते आहेत. पुढील काही दिवसांत आणखी रोमांचकारी घटना घडणार आहेत.

 

बुधवारच्या पहिल्याच दिवशी अंकित टकले यांनी आपल्या खेळाने सगळयांचे लक्ष वेधून घेतले. एकापाठोपाठ दोनदा पात्र ठरलेले ते ‘पीएसएल’चे पहिलेच खेळाडू ठरले. ‘गुजरात फाल्कन’चे सल्लागार रोमित आडवाणी यांनी ‘हेड्स अप’ खेळासाठी अंकित टकले यांची निवड केली. दुसऱ्या फेरीत टकले यांचा सामना आंतरराष्ट्रीय कीर्तीचे केविन मॅक्फी यांच्याशी झाला. एका चुरशीच्या क्षणी प्रतिस्पर्ध्यावर मात करून मुंबईकर टकले यांनी ब्रेसलेट पटकाविले तेव्हा जमलेल्या प्रेक्षकांनी एकच जल्लोष केला.

 

‘पोकर स्पोर्टस लीग’ ही जागतिक ‘पोकर लीग’प्रमाणेच आहे. तीत एखाद्या प्रतिभावंत पोकर खेळाडूला नामवंत पोकर खेळाडूंच्या मार्गदर्शनाखाली प्रस्थापित खेळाडूंविरुद्ध उभे ठाकता येते; इतकेच नव्हे तर पारितोषिकाच्या घसघशीत रकमेबरोबरच नाव आणि प्रसिद्धीही मिळते. येत्या ११ ते १७ जून या कालावधीत ‘दूरदर्शन’च्या क्रीडा वाहिनीवर या नाट्याचे प्रक्षेपण सर्वसामान्यांना पाहता येईल.

 

ही स्पर्धा आता सुरू झाली आहे. येत्या १३ मे रोजी कोटी ५० लाख रुपये रकमेच्या रोख पारितोषिकांनी तिची सांगता होईल