पेपरफ्रायतर्फे गोव्यात स्टुडिओ लाँच

0
1718

 

 

गोवा खबर:पेपरफ्राय या भारतातील पहिल्या क्रमांकाच्या फर्निचर आणि गृहोपयोगी उत्पादनांच्या बाजारपेठेने आज त्यांच्या २९व्या स्टुडिओची घोषणा गोव्यात केली. गेल्या तीन वर्षात पेपरफ्रायने देशात फर्निचर व गृहोपयोगी वस्तूंच्या विभागात सर्वांत मोठा सर्वकाही एकाच ठिकाणी उपलब्ध करून देणारा (ओम्नी-चॅनल) व्यवसाय म्हणून स्वत:ला प्रस्थापित केले आहे. महानगरे व देशातील प्रथम श्रेणी शहरांवर लक्ष केंद्रित करत स्टुडिओच्या स्वरुपात सर्वत्र पोहोचण्याचे लक्ष्य आता पेपरफ्रायने ठेवले आहे. पेपरफ्रायने १६ शहरांत २९ स्टुडिओ (मालकीचे व फ्रँचायझी स्वरूपातील) स्थापन करून स्टुडिओंचे जाळे विस्तारले आहे आणि एप्रिल २०१९पर्यंत सर्व महत्त्वाच्या बाजारपेठांमध्ये मिळून ७० स्टुडिओ स्थापन करण्याची कंपनीची योजना आहे.

पेपरफ्रायने गोव्यात सोनू चटवाल यांच्या कुणाल रिटेल्ससोबत भागीदारी करून फ्रँचायझी स्टुडिओ सुरू केला आहे. कुणाल रिटेल्स कस्टमाइझ्ड फर्निचरसाठी तसेच संपूर्ण होम सोल्युशन पुरवण्यासाठी ओळखले जाते. चीन, दिल्ली व कानपूर येथे त्यांचा व्यवसाय आहे. म्हापसा-पणजी मार्गावर मोक्याच्या ठिकाणी ४२०० चौरस फूट जागेत हा स्टुडिओ पसरलेला आहे. या स्टुडिओला भेट देऊन गोव्यातील ग्राहकांना अत्याधुनिक डिझाइन्स, फर्निचरचे विविध प्रकार आणि निरनिराळ्या लाकडांपासून तसेच साहित्यापासून तयार करण्यात आलेल्या गृहसजावटीच्या वस्तू बघायला मिळतील तसेच पेपरफ्रायच्या खास घडवलेल्या उत्पादनांची कल्पना येईल. तज्ज्ञ इंटिरिअर डिझायनर्स आणि आर्किटेक्ट्स या स्टुडिओचे व्यवस्थापन बघत आहेत. पेपरफ्रायचे ग्राहक त्यांच्या स्वप्नातील घरे प्रत्यक्षात आणण्यासाठी इंटिरिअर डिझायनिंग सल्ला सेवेचा लाभही घेऊ शकतील.

पेपरफ्रायने आपला पहिला स्टुडिओ २०१४ मध्ये सुरू केला आणि गेल्या काही वर्षांत स्टुडिओ हा त्यांना ग्राहक मिळवून देणारा प्रमुख घटक म्हणून विकसित झाला आहे. त्यांच्या एकंदर व्यवसायात २५ टक्के योगदान स्टुडिओंचे आहे. देशभरातील नव्या युगाच्या उद्योजकांना बढावा व प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने पेपरफ्रायने गेल्या वर्षीच फ्रँचायझी स्वरुपात व्यवसाय करण्यास सुरुवात केली. पेपरफ्रायचे फ्रँचायझी मॉडेल हे खऱ्या अर्थाने अनोखे व्यवसाय प्रारूप असून यामध्ये रस घेणाऱ्या भागीदारांना खूप मोठा व्यवसाय मिळवून देण्याची क्षमता आहे. देशातील अन्य फ्रँचायझी मॉडेल्सपेक्षा हे मॉडेल वेगळे असून यात भागीदाराकडे स्वत:चा उत्पादन संग्रह किंवा यादी असण्याची आवश्यकता नाही, तर हे १०० टक्के दरसमानतेवर (प्राइस पॅरिटी) आधारलेले आहे. पेपरफ्राय देत असलेल्या कमिशनची रचना आकर्षक असून फ्रँचायझी स्टुडिओमध्ये झालेल्या प्रत्येक ऑनलाइन व्यवहारावर फ्रँचायझी मालक कमिशन प्राप्त करून लाभ मिळवू शकतात. पेपरफ्राय ग्राहकांना एण्ड टू एण्ड सेवा देण्याची व्यवस्था करत असून, डिलिव्हरीपासून असेम्ब्लीपर्यंत प्रत्येक टप्प्यावर सेवा दिल्याने ग्राहकांची खरेदीची प्रक्रिया सुरळीत पार पडेल.

या स्टुडिओच्या माध्यमातून पेपरफ्रायचा गोव्यात प्रवेश झाला असून गोव्यातील बाजारपेठ ही पहिल्या १५पैकी एक आहे. कंपनीने ग्राहकांप्रती असलेली बांधिलकी अधिक दृढ केली असून, त्यांना सर्वोत्तम दर्जाचा खरेदी अनुभव कंपनी देणार आहे. पेपरफ्राय गोव्यात फुलफिलमेंट सेंटरच्या माध्यमातून गेली तीन वर्षे फर्निचरचे वितरण करत असून, स्टुडिओमुळे येथील व्यवसायात वाढ होईल अशी अपेक्षा कंपनीला आहे.

पेपरफ्रायचे संस्थापक आणि सीओओ आशीष शहा म्हणाले, “बेंगळुरू आणि इंदोरमध्ये यशस्वीरित्या स्टुडिओ लाँच झाल्यानंतर आता कुणाल रिटेल्सच्या सहयोगाने गोव्यात स्टुडिओ लाँच झाल्याबद्दल आम्हाला आनंद वाटतो. व्यापाराच्या माध्यमातून ते गेली सहा वर्षे आमच्याशी जोडलेले आहेत. कुणाल रिटेल्ससोबत सहयोग वाढवण्यास आम्ही उत्सुक आहोत. त्याचसोबत अनुभवी उद्योजकांना मोठा नफा मिळवून देणारा फ्रँचायझी व्यवसाय विकसित करण्याची संधी देऊन भारतात सुक्ष्म-उद्योजकतेला प्रोत्साहन देण्याचे लक्ष्य आमच्यापुढे आहे. या सहयोगामुळे आमचे ओम्नी-चॅनल स्थान अधिक भक्कम होईल आणि राज्यातील चिकित्सक ग्राहकांसोबत आमचे नाते वृद्धिंगत होईल अशी खात्री मला वाटते.”

ते पुढे म्हणाले, “गृहोपयोगी उत्पादने आणि फर्निचर विभागात महानगरे आणि मोठ्या शहरांमध्ये आमचे सर्वाधिक स्टुडिओ असून आमचे जाळे प्रथम श्रेणी शहरांमध्ये आणखी विस्तारण्यास आम्ही सज्ज आहोत. आमचे नवीन भागीदार फर्निचर विभागाशी उत्तम परिचित आहेत आणि म्हणूनच या सहयोगामुळे आमची ओम्नी-चॅनल वाढ अधिक जोमाने होईल अशी खात्री मला वाटते.”

कुणाल रिटेल्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी सोनू चटवाल म्हणाले, “व्यवसाय सुरू केल्यानंतर दोनेक वर्षांतच बाजारपेठेत आघाडीचे स्थान पटकावणाऱ्या पेपरफ्रायसोबत आमची भागीदारी अधिक दृढ करणे आमच्यासाठी रोमांचक अनुभव आहे. पेपरफ्राय आणि फर्निचर व गृहोपयोगी उत्पादनांचा व्यवसाय हे समानार्थी शब्द झाले असताना त्यांच्यासोबत भागीदारीची संधी ही आमच्यासाठी २०२० सालापर्यंत २० दशलक्ष घरांमध्ये पोहोचण्याच्या त्यांच्या उद्दिष्टाला पूरक काम करण्याची संधी आहे. पुढील काही महिन्यांत त्यांच्या सहयोगाने आणखी काही फ्रँचायझी स्टुडिओ सुरू करण्यास आम्ही उत्सुक आहोत.”

PEPPERFRY.COMविषयी

पेपरफ्राय ही भारतातील आघाडीची फर्निचर व गृहोपयोगी वस्तूंची बाजारपेठ असून ग्राहकांना गृहोपयोगी उत्पादनांमध्ये अन्यत्र कुठेच मिळणार नाही अशी निवडीची संधी व खरेदीचा उत्तम अनुभव कंपनी सातत्याने देत आहे. पेपरफ्रायद्वारे व्यवस्थापित बाजारपेठेमुळे हजारो उद्योजक व व्यापाऱ्यांना देशभरातील तसेच जगातील लक्षावधी चिकित्सक ग्राहकांना आपली उत्पादने विकण्यात मदत मिळते.