पेडणे शिगमोत्सवात उद्या सलाम गोवा

0
1134
  1. गोवा खबर:पेडणे शिगमोत्सव समिती तर्फे रविवार दिनांक ११ मार्च रोजी संध्याकाळी ठिक ७ वाजता, पेडणे टॅक्सी स्टॅंड येथे वैष्णवी क्रिएशन्स् प्रस्तुत “सलाम गोवा” संगीत रजनी आयोजित करण्यात आली असुन, नामवंत सिने कलाकारांचा कलाविष्कार पाहण्याची संधी पेडणेकरांना मिळणार आहे.

गोवा पर्यटन खात्याच्या सहयोगाने आयोजित ह्या कार्यक्रमाचे, पेडणेचे आमदार, पर्यटन व क्रिडा मंत्री मनोहर उर्फ बाबू आजगांवकर ह्यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. यावेळी नगराध्यक्षा श्रद्धा माशेलकर, उपनगराध्यक्ष, पेडणेचे सर्व सरपंच व पंच सदस्य,  जिल्हा परिषद सदस्य व इतर मान्यवर उपस्थित असतील.

सिने अभिनेत्री मृण्मयी देशपांडे तसेच इटिव्ही फेम विनोदी अभिनेता अरूण कदम, विनोदी अभिनेत्री मीरा मोडक तसेच सारेगामा फेम गायक व नट चैतन्य कुलकर्णी, काॅमेडी एक्सप्रेस फेम अक्षता सावंत, पार्श्वगायीका श्रुति जोशी ह्या कार्यक्रमांत नृत्य व स्वराविष्कार सादर करणार आहेत. सिने अभिनेत्री दिप्ती भागवत ह्या रजनीचे निवेदन करतील.

नामवंत नृत्य दिग्दर्शिका मेघा संपत ह्यांच्या नृत्य संस्थेतील सुमारे २५ नर्तक आपला नृत्याविष्कार सादर करणार असुन, गोमंतकीय संगित संयोजक विष्णू शिरोडकर, रोहित बांदोडकर, प्रकाश आमोणकर, अवधुत चारी, सांतान कार्वालो, सुशिल कुमार, निकलाव व निहाल पै काणे हे वाद्यवृंद साथ करणार आहेत.

सलाम गोवा संगित रजनीत हल्लिच दिवंगत झालेल्या नामवंत अभिनेत्री श्रीदेवी ह्यांना खास नृत्याविष्काराने आदरांजली वाहण्यात येणार आहे.

दरम्यान आज शनिवार दि. १० मार्च रोजी पेडणे शिगमोत्सव समितीतर्फे श्री भगवती देवीच्या चरणी नारळ ठेवून शिगमोत्सवास सुरूवात झाली. सोमवार दि. १२ मार्च रोजी चित्ररथ, रोमटांमेळ, लोकनृत्य व वेषभूषा मिरवणूक व स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.