पेडणे बोगडयात दरड कोसळली; कोकण रेल्वे मार्गावरील वाहतूक अन्य मार्गे वळवली

0
448
गोवा खबर : कोकण रेल्वे मार्गावर पेडणे ते मडूरा रेल्वे स्थानकां दरम्यान बोगद्यात काल मध्यरात्री उशिरा दरड कोसळल्याने कोकण रेल्वे मार्गावरील वाहतुक ठप्प झाली आहे.
दरड हटवण्याचे काम युद्धपातळीवर सुरु असून या मार्गावरील गाड्या अन्य मार्गावर वळवण्यात आल्या आहेत.
अन्य मार्गावरुन वळवण्यात आल्या आहेत.
एर्नाकुलम निजामुद्दीम सुपरफास्ट स्पेशल एक्सप्रेस, थिरुवंतनपुरम सेंट्रल लोकमान्य टिळक स्पेशल एक्सप्रेस, राजधानी स्पेशल एक्सप्रेस, निजामुद्दीम एर्नाकुलम एक्सप्रेस व लोकमान्य टिळक थिरुवंतनपुरम सेंट्रल एक्सप्रेस या गाड्या पनवेल- पुणे- मिरज- लोंढा मार्गे मडगाव अशा वळविण्यात आल्याची माहिती कोकण रेल्वे प्रशासनाने प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.