पेडणेत आजगावकर यांच्यामुळे नाईक यांना 10 हजारांची आघाडी

0
1207
गोवा खबर:पेडणेचे आमदार तथा उपमुख्यमंत्री मनोहर उर्फ बाबू आजगावकर यांनी मगो पक्षाचा राजीनामा देऊन भाजपात केलेला प्रवेश सार्थ ठरवत उत्तर गोव्यातून भाजप उमेदवार श्रीपाद नाईक यांना १० हजार७२९ मतांची विक्रमी आघाडी मिळवून दिली आहे.
पेडणेच्या भवितव्यासाठी वावरणाऱ्या बाबू आजगावकरांना आमची सदैव साथ लाभेल अशी ग्वाही पेडणे नगरपालीकेच्या नगराध्यक्ष व विवीध पंचायतीच्या सरपंचानी दिली आहे.
बाबू आजगावकरांचे  कुशल नेतृत्व, संघटन कौशल्य व अचुक निर्णय क्षमता यामुळेच समस्त पेडणेवासीयांना खासदार श्रीपाद नाईक याना विक्रमी मताधिक्य देण्याचे भाग्य  मीळाले व त्यासाठी   बाबू आजगांवकर  अभिनंदनास पात्र आहेत.
बहुजन समाजाचा आवाज दडपण्याचा कुटील डाव हाणुन अगदी वेळेवर मगोची साथ सोडुन भाजपात आलेल्या बाबू आजगावकरांच्या मागे पेडणेवासीय खंबीरपणे उभे आहेत हे लोकसभा निकालाने विरोधी काँग्रेस व मगो पक्षाला कळुन चुकले असेल. मंत्री बाबू आजगावकर यांच्यावर बेताल आरोप करणाऱ्यांना या निकालाने सणसणीत चपराक बसली असल्याचे त्यानी पुढे म्हटले आहे.
पेडणेत आयुष इस्पितळाचा प्रकल्प आणणारे श्रीपाद नाईक यापुढे ही आमदार बाबू आजगावकरांच्या साथीने पेडण्याचा कायापालट करतील असा विश्वासही त्यानी व्यक्त केला आहे.
पेडणेत विकासाची गंगा आणुन बाबू आजगावकरानी एकेकाळचा हा मागास मतदारसंघ आज खऱ्या अर्थाने विकसीत केला आहे व आगामी काळात स्थानिक युवकांच्या भल्यासाठी ते वावरतील असा विश्वास नगराध्यक्ष व सरपंचानी व्यक्त केला आहे.
आजगावर यांनी सुविधा तेली- नगराध्यक्ष (पेडणे नगरपालीका)
प्रमिला देसाई-सरपंच (कोरगाव)
भारत गावडे-सरपंच (विर्नोडा)
वल्लभ वराडकर – सरपंच (धारगळ)
पल्लवी परब- सरपंच ( वारखंड-नागझर)
संगिता गांवकर-सरपंच (ओझरी)
रोश फर्नांडिस- सरपंच (खाजने-आमेरे-पोरस्कडे)
रमेश पालयेकार-सरपंच ( कासारवर्णे)
बबन डिसोजा- सरपंच ( तोरशे)
संतोष मळीक- सरपंच ( चांदेल-हंसापुर)
नारायण राऊळ- सरपंच ( अळोर्णा)
सोनाली पवार- सरपंच ( इब्रामपुर-हणखणे) यांच्या साथीने नाईक यांना पेडणे मतदारसंघातून आघाडी मिळवून देण्यात यश मिळवले.