पॅनासोनिक तर्फे इलुगा ए३ आणि ए३ प्रो सादर

0
999

23 ऑगस्ट २०१७-नवीन तंत्रज्ञान आणि स्मार्टफोन शृंखलेत नवीनतेला चालना
देण्याप्रती आपल्या प्रतिबद्धतेला अनुरूप, पॅनासोनिक इंडिया तर्फे पॉवर पॅक्ड इलुगा ए३ आणि
ए३ प्रो सादर करण्यात आले आहे. या लाँच साठी वर्तमान ब्रँड अँबेसेडर वरून धवन सोबत
बॉलिवूड सेलिब्रिटी तापसी पन्नू ला स्मार्टफोन व्यवसायाचा नवा चेहरा म्हणून समाविष्ट
करण्यात आले आहे. नवीन इलुगा प्रॉडक्ट शृंखलेसाठी नवीन ब्रँड मोहीम '' सो मच टू डू '' देखील
सादर करण्यात आली आहे.
पॅनासोनिक इलुगा ए३ आणि ए३ प्रो वर्चुअल असिस्टंट, आरबीओ ने सुस्सजीत आहे. स्टायलिश
डिजाईन, उत्तम कॅमेरा, संपूर्ण मेटल बॉडी, स्प्लिट स्क्रिन आणि ४००० एमएएच बॅटरी सोबत
येतात जे स्मार्टफोनला भरपूर बॅकअप देतात. इलुगा ए३ ची किंमत रु. ११२९० तर इलुगा ए३ प्रो
रु. १२७९० आहे.
श्री मनीष शर्मा, प्रेसिडेंट आणि सीइओ,पॅनासोनिक इंडिया आणि दक्षिण एशिया, वाईस प्रेसिडेंट,
अप्लायन्सेस कंपनी आणि एक्झीक्यूटिव्ह ऑफिसर पॅनासोनिक कॉर्पोरेशन;श्री पंकज राणा
बिजनेस हेड, मोबिलिटी डिविजन, पॅनासोनिक इंडिया आणि अभिनेत्री तापसी पन्नू यांच्या
उपस्थितीत हे स्मार्टफोन लॉन्च करण्यात आले.