पॅनासोनिकने नव्या इंटेलिजंट उत्पादनाच्या श्रेणीसह घरगुती उपकरण श्रेणीमध्ये केला विस्तार

0
1472

 

अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या वैशिष्ट्यांची वॉशिंग मशीन, मायक्रोव्हेव आणि रेफ्रिजरेटर यांची नवी श्रेणी सादर

 

 

गोवाखबर : तंत्रज्ञान आणि नावीन्यपूर्णता अशा अतुलनिय वचनबद्धतेसाठी, पॅनासोनिक इंडियाने `इंटेलिजंट घरगुती उपकरणे’ श्रेणीचा विस्तार आज जाहीर केला आहे, यात रेफ्रिजरेटर, वॉशिंग मशीन आणि मायक्रोव्हेव यांचा समावेश आहे. ही इंटेलिजंट श्रेणी इकॉनवि (ECONAVI) इन्व्हर्टर तंत्रज्ञानासारख्या महत्त्वाच्या तंत्रज्ञान आणि वैशिष्ट्यांनी सज्ज आहे, या तंत्रज्ञानातील वेगळ्या सेंसरमुळे वाया जाणाऱ्या ऊर्जेचे निदान केले जाते आणि पर्यावरणीय परिस्थितीनुसार सकारात्मक बदल केले जातात. नव्या श्रेणीत रेफ्रिजरेटरची चार मॉडेल, वॉशिंग मशीनची १७ मॉडेल आणि नवीन इन्व्हर्टर मायक्रोव्हेव मॉडेल यांचा समावेश आहे. यात तंत्रज्ञान, वापर आणि सौंदर्य यांचे योग्य समीकरण आहे. ही श्रेणी अत्याधुनिक युगातील ग्राहकांसाठी उपयुक्त ठरतील अशीच आहेत. या नव्या श्रेणीच्या उद्घाटनासह, पॅनासोनिकने आर्थिक वर्ष २०१८-२०१९ मधील घरगुती उपकरणे प्रकारात ४० टक्क्यांचा विकास केला आहे.

वापरकर्त्यांचे दैनंदीन आयुष्य अधिक आऱामदायी व्हावे, सुलभ व्हावे, तसेच उत्पादनांत ऊर्जा सक्षमता असावी यासाठी त्यांची खास रचना करण्यात आलेली आहे, ही नवीन मॉडेल्स अत्याधुनिक विशेष तंत्रज्ञानांनी सुसज्ज आहे. स्पार्कलिंग क्लिन वॉश होईल याची काळजी घेण्यात आलेली आहे, नवीन वॉशिंग मशीनच्या मॉडेलमध्ये अॅक्टिव्ह फोमच्या समावेशासह हाय डेस्टिनी फोमची निर्मिती करण्यात आली आहे, यामुळे कपडयांमधील घाण खोलवर काढून टाकता येते, तर स्टेनमास्टर वैशिष्ट्यामुळे चिवट डाग केवळ एका बटण दाबून काढून टाकता येतात. ही मॉडेल ६.२ किलो आणि १४ किलो या प्रकारात २०,००० ते ६०,०००० रु. या किंमतींमध्ये उपलब्ध आहेत. ताजेपणाची नवी व्याख्या देणारा आणि आपल्या चांगल्या आरोग्यासाठी कार्यरत असणाऱ्या ३०७ लिटर आणि ३३६ लिटरच्या रेफ्रिजरेटरची किंमत अनुक्रमे ३७,००० आणि ४५,००० रुपये आहे, यातील इकॉनवि (ECONAVI) सेंसरमुळे कुलिंग चांगले होते, यामुळे अर्थातच ऊर्जेची बचत होते, यातील एजी क्लीन तंत्रज्ञानामुळे ९९.९ टक्के बॅक्टेरिया काढून टाकले जातात. उत्तम आरोग्याची काळजी घेणारी पॅनासोनिक मायक्रोव्हेव उत्पादने ६७०० ते २०,९९० रुपये अशा किंमतीत उपलब्ध आहेत, तेलरहित पाककृतींमुळे वापरकर्त्यांना आरोग्यदायी स्वयंपाक करता येतो.

जास्तीत जास्त ऊर्जा बचत व्हावी आणि पाण्याचा वापर कमी व्हावा यासाठी इकॉनवि (ECONAVI) तंत्रज्ञानाचा समावेश असलेले रेफ्रिजरेटर आणि वॉशिंग मशीनची निर्मिती करण्यात आली आहे. पॅनासोनिकच्या इंटेलिजंट इन्व्हर्टररेफ्रिजरेमधील इकॉनवि(ECONAVI)मुळे कुलिंग ५० टक्के जलद गतीने होते, तसेच इलेक्ट्रिसिटीचा वापरही कमी होतो –यात इन्व्हर्टर ४९ टक्क्यांपर्यंत आणि इकॉनवि (ECONAVI) तंत्रज्ञान १० टक्क्यांपर्यंत ऊर्जेची बचत करते. इकॉनवि(ECONAVI) सेंसर तंत्रज्ञानामुळे रेफ्रिजरेटच्या चांगल्या कुलिंगच्या पॅटर्नवर आणि ऊर्जा बचतीच्या मोडवर ग्राहकांच्या जीवनशैलीनुसार नियंत्रण ठेवणे शक्य होते. तसेच वॉशिंग मशीनमधील इंटेलिजंट सेसंरमुळे कपडे आणि पाण्याचे तापमान यांचे प्रमाण नियंत्रित केले जाते, तसेच ऊर्जा, पाणी आणि वेळ यांच्या बचतीसाठी कपडे धुण्यासाठीचे सर्वात चांगले सायकल निवडले जाते. ही सर्वच्या सर्व तीन उत्पादने इन्व्हर्टर तंत्रज्ञानासह सज्ज आहेत आणि ती सक्षम प्रक्रिया आणि लक्षणीय ऊर्जा बचत व कमीत कमी आवाज याची खात्री देते.

या उद्घाटनानिमित्ताने पॅनासोनिकच्या घरगुती उपकरणांचे प्रमुख श्री. गौरव मिनोचा म्हणाले की, “नावीन्यपूर्णता आणि तंत्रज्ञान यामध्ये पॅनासोनिक नेहमीच आघाडीवर असते. आमच्या नवीन लोकप्रिय घरगुती उपकरणांच्या श्रेणीतून आम्ही इंटेलिजंट उपकरणे आणि घरगुती उपाययोजना सादर करत आहोत. आमच्या घरगुती उपकरणांच्या नव्या श्रेणीसह आम्ही पुढील काही वर्षांत बाजारपेठेतील वाटा दोन अंकी आकड्यापर्यंत नेण्याचा प्रयत्न करणार आहोत.’’ पॅनासोनिकची नवीन श्रेणी कोलकातामध्ये सादर करताना, श्री. मिनोचा पुढे म्हणाले की, “आमच्यासाठी कोलकाता सर्वात जास्त क्षमतेचे शहर आहे, यामुळेच आम्ही या सिटी ऑफ जॉयमध्ये आमची नवीन श्रेणी सादर करण्याचा निर्णय घेतला.’’

वॉशिंग मशीन

पाठीमागे पॅनल असलेल्या पॅनासोनिकच्या नवीन श्रेणीत `अॅक्टिव्ह फोम’, `अॅक्वा स्पिन’ आणि `स्टेन मास्टर’अशा नव्या वैशिष्ट्यांचा समावेश करण्यात आला आहे. अॅक्टिव्ह फोममुळे अधिक चांगला फेस तयार केला जातो, हा फेस डाग काढण्यासाठी आणि कपडे उत्तम प्रकारे धुण्यासाठी कपडयांपर्यंत जास्तीत जास्त प्रमाणात पोचतो. नवीन वॉशिंग मशीनमध्ये अनेक प्रकार एकत्रितपणे देण्यात आले आहेत, यात 25 टक्के कमी पाणी वापरणारे वैशिष्ट्यं आहे, तसेच मोठ्या आकाराचा वॉशिंग टब आहे, याबरोबरच हे उत्पादन ग्रे चारकोल ते फ्लोरल ब्लू अशा 7 विविध रंगांत उपलब्ध आहे. अॅक्वा स्पिन या वैशिष्ट्यात 6 रिंगचा शॉवर देण्यात आलेला आहे, ग्राहकांना कपड्यांवरील चिवट डाग घालवण्यासाठी याचा अधिक चांगला उपयोग होतो.

मायक्रोव्हेव

पॅनासोनिकच्या मायक्रोव्हेव ओव्हनच्या नवीन श्रेणीत ग्राहकांना खास तेलरहित आरोग्यदायी पाककृती उपलब्ध होतात, या पाककृतींमध्ये बटर, लोणी आणि तूप यांचाही वापर करावा लागत नाही. ३० लिटरच्या कन्व्हेक्शन मायक्रोव्हेवमध्ये तेलरहित स्वयंपाक केल्याने तुम्ही आरोग्यदायी खाण्याच्या सवयी लावून घेता. पॅनासोनिक एमडब्ल्यूओ -३० कन्व्हेक्शन मॉडेल २०, २३ आणि २७ लिटर अशा प्रकारात उपलब्ध आहे. या मॉडेलमध्ये क्विक जेवणासाठी ऑटो मेन्यू, साफसफाई सोपी जावी म्हणून वेपर क्लिन आणि कुठल्याही घाणीला मज्जाव करण्यासाठी इपॉक्सी ग्रे कॅविटी कोटिंग अशी वैशिष्ट्ये आहेत. तसेच इन्व्हर्टर तंत्रज्ञानामुळे अगदी कमी सेटिंग्जमध्येही अमर्यादित स्वयंपाक करण्याची क्षमता, चव आणि पदार्थाचे टेक्शर कायम राखणे अशा क्षमता प्राप्त होतात. या मायक्रोव्हेवमध्ये डबल हिटिंग क्षमता आहे, यामुळे ग्राहकांना सातत्याने बार्बेक्यू, बेक करणे किंवा भारतीय तंदूर पाककृती करणे शक्य होते. पॅनासोनिकमध्ये सोलो आणि ग्रील असे प्रकारही २० लिटरमध्ये क्विक जेवण आणि हिटिंगसाठी उपलब्ध आहेत.

रेफ्रिजरेटर

पॅनासोनिकच्या नव्या श्रेणीतील पहिले उत्पादन झाज्जर येथे अलिकडेच सुरू झालेल्या कारखान्यात तयार करण्यात आले आहे, या रेफ्रिजरेटरमध्ये अनेक वैशिष्ट्ये आणि अत्याधुनिक तंत्रज्ञान यांचा समावेश आहे, तसेच आजच्या अत्याधुनिक स्वयंपाकघरासाठी हे उत्पादन अगदी चपखल बसणारे आहे. यावरील स्टायलिश फ्लोरल प्रिंटची श्रेणी सहा स्पीड इन्व्हर्टर कॉम्प्रेसरसह अत्याधुनिक इकॉनवि (ECONAVI) तंत्रज्ञानाद्वारे सादर करण्यात आली आहे, या स्मार्ट कुलिंग करणाऱ्या तंत्रज्ञानामुळे चांगली कामगिरी आणि ऊर्जा बचत केली जाते. या उत्पादनातील जास्त क्षमतेचे स्टोरेज ग्राहकांना भाज्या आणि फळे योग्य आर्द्रतेमध्ये आणि एकाच तापमानात साठवण्यास मदत करते, तसेच त्याचा ताजेपणा टिकून राहील याची खात्री देते. हे उत्पादन बर्फ न साठणारे आहे आणि ते फ्लॉवर वाईन, फ्लॉवर ब्लू आणि वाईन लिली अशा रंगांत उपलब्ध आहे.