पूर्व राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांना पंतप्रधानांनी त्यांच्या राष्ट्रपती भवनाच्या वास्तव्यातील शेवटच्या दिवशी लिहिलेले पत्र

0
844
पूर्व राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी आज पंतप्रधान मोदीद्वारे त्यांना लिहिलेले पत्र सर्वांना वाचता यावे म्हणून  प्रसिद्धीसाठी दिले असून हे पत्र मुखर्जी यांच्या राष्ट्रपती भवनाच्या वास्तव्यातील शेवटच्या दिवशी लिहिलेले   असून अत्यंत भावस्पर्शी आहे.
माननीय प्रणव दा,
आज तुम्ही तुमच्या ठरविलेल्या प्रवासाकडे वाटचालीला सुरवात केली असली तरी  तुम्ही  राष्ट्र उभारणीत केलेले योगदान  विशेषतः  गेल्या पाच वर्षातील तुमचा राष्ट्रपती  पदाचा कार्यकाळ विसरता येणार नाही. तुम्ही आम्हाला तुमच्या साध्या   विचारसरणीने,  उच्च  तत्त्वज्ञानाने आणि नेतृत्वगुणांनी अभिप्रेरित केले आहे.तीन वर्षांपूर्वी मी जेंव्हा  दिल्लीला  तिऱ्हाईत म्हणून आलो त्यावेळी माझ्या समोर  अनेक कामे आणि   आव्हाने होती.  या कठीण कालावधीत तुम्ही मला वडील  आणि गुरु सारखे मार्गदर्शन केलेत. तुमचा अनुभव , मार्गदर्शन आणि वैयक्तिक  स्नेह मला आत्मविश्वास आणि बळकटी देऊन गेला.तुमच्या जवळ ज्ञानाचे भांडार आहे हे सर्वाना माहिती आहे . मला नेहमीच तुमच्याकडील विविध विषयांवरील ज्ञानाचे अप्रूप वाटत आले आहे अगदी धोरणांपासून राजकारणापर्यंत, अर्थशास्त्र ते आंतरराष्ट्रीय व्यवहार, सुरक्षा प्रकरणे ते राष्ट्रीय आणि जागतिक महत्वापर्यंत. तुमच्या बौद्धिक क्षमतेचा उपयोग मला आणि माझ्या सरकारला निरंतर झाला आहे.तुम्ही  खूप काळजी घेणारे, आकर्षक आणि प्रेमळ व्यक्तिमत्व असलेले आहात. तुमचा एक फोन मला सतत माझ्या तब्येतीबाबत विचारणा करीत असतो आणि दिवसभराच्या लांब मिटिंग नंतर किंवा प्रसार दौऱ्यानंतर   पुनर्जीवित व्हायला  पुरेसा असतो.प्रणवदा, आपला राजनैतिक प्रवासाला वेगळ्या राजकीय पक्षातून सुरवात  होऊन  विशिष्ट आकार प्राप्त झाला आहे. आपल्या कालपरत्वे संकल्पना खूप वेगळ्या आहेत. आपले अनुभव सुद्धा वेगळे. मला माझ्या राज्यातील प्रशासकीय अनुभव आहे तर तुम्ही दशकांपासून राष्ट्रीय धोरणे आणि राजकारणाशी  वाकीब  आहात तथापि,एकत्रित काम करण्यासाठी   हीच आपली बौद्धिक संपदेची पुंजी आहे.तुमच्या राजकीय प्रवासात आणि राष्ट्रपती कालावधीत, तुम्ही इतर गोष्टींपेक्षा राष्ट्राला  महत्व दिले.  तुम्ही राष्ट्रपती भवनांचे दरवाजे नवनवीन कार्यक्रम  आणि  भारताच्या युवकांच्या बौद्धिक  नवीनतेला खुली केलीत.तुम्ही अशा नेतृत्व असलेल्या  पिढीचे प्रतिनिधित्व केले ज्यांनी समाजाच्या विकासासाठी स्वहिताविना   राजकारणाचा माध्यम म्हणून उपयोग केला. भारतीय जनतेसाठी तुम्ही अभिप्रेरणाचा एक स्रोत होता. भारताला तुमच्या विषयी नेहमीच आदर भाव राहील.तुमचे विचार नेहमीच आम्हाला मार्गदर्शक राहतील. तुमच्या लोकशाही दृष्टिकोनातून जे तुम्ही सार्वजनिक जीवनाचा एक अविभाज्य अंग बनविले, आम्ही त्यातून  निरंतर प्रेरणा घेत राहू. आज तुम्ही जीवनाच्या एका नवीन टप्प्यात प्रवेश करीत आहेत , मी तुम्हाला तुमच्या भविष्यासाठी शुभेच्छा  देतो.पुन्हा एकदा तुमच्याकडून मिळालेल्या प्रेरणा, मार्गदर्शन आणि  पाठिंब्याबद्दल आभार. तुम्ही काही दिवसांपूर्वी संसदेत माझ्याविषयी केलेल्या स्तुती बद्दल आभार.राष्ट्रपतीजी, तुमचा  पंतप्रधान म्हणून तुमच्या बरोबर काम करणे हा माझ्यासाठी  सन्मान आहे.

जयहिंद.आपला नम्र,

नरेंद्र मोदी