पुलवामाच्या बदल्यास सुरुवात;2 दहशतवाद्यांना कंठस्नान

0
1131
गोवा खबर : जम्मू काश्मीरमधील पुलवामायेथे सुरू असलेल्या चकमकीमध्ये जवानांनी 2 दहशतवाद्यांना यमसदनी पाठवून आपल्या बदल्यास सुरुवात केली आहे.आजच्या चकमकित  ‘जैश-ए-मोहम्मद’च्या दोन कमांडर्सना कंठस्नान घालण्यात जवानांना यश आले आहे. 

ते घरच दिले अडवून..

 ज्या घरामध्ये दहशतवादी लपून बसले होते, ते घरच जवानांनी स्फोटकांनी उडवून दिले.उपलब्ध माहितीनुसार, पुलवामा हल्ल्याचे मास्टरमाइंड व ‘जैश-ए-मोहम्मद’चा कमांडर कामरान आणि कमांडर अब्दुल रशीद गाझी हे तेथे होते आणि त्यांच्या चिंधडया उडवण्यात यश आले आहे.
 भारतीय लष्कराकडून अधिकृतरित्या या वृत्तास अद्याप दुजोरा मिळालेला नाही.
अब्दुल रशीद गाझी हा पुलवामा दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाइंड होता. पुलवामा हल्ल्यानंतर गाझी आणि कामरान पसार झाले होते. दरम्यान, गाझी हा ‘जैश-ए-मोहम्मद’चा म्होरक्या मसूद अझहरचा सर्वात जवळील हस्तक असल्याची माहिती समोर आली आहे.

पुलवामातील हल्ल्यानंतर देशभर संतापाची लाट उसळली आहे.लोकांच्या भावना लक्षात घेऊन सरकारने लष्कराला बदल्याच्या कारवाई फ्री हैंड दिला आहे.आज हल्ल्याचा बदला घेण्यास सुरुवात झाली आहे. आज 2 दहशतवाद्यांना ठार करून जवानांनी पुलवामाचा बदला घेतला आहे.
पुलवामा जिल्ह्यातील पिंगलान भागात दहशतवादी लपल्याची माहिती मिळाल्यानंतर भारतीय लष्कराच्या ५५ राष्ट्रीय रायफल्स , सीआरपीएफ आणि एसओजीच्या जवानांनी मध्यरात्रीनंतर परिसराला घेरले. हे लक्षात येताच दहशतवाद्यांनी जवानांवर गोळीबार करायला सुरू केले. यात मेजरसह ५ भारतीय जवान शहीद झाले. शहिदांमध्ये मेजर डी. एस. डोंडियाल, हेड कॉन्स्टेबल सावे राम, शिपाई अजय कुमार आणि शिपाई हरी सिंग यांचा समावेश आहे.

मात्र गेल्या तीन तासांपासून दोन्ही बाजूंनी गोळीबार बंद झालेला असून, भारतीय जवानांनी शोधमोहीम सुरूच ठेवली आहे. भारतीय जवानांनी घेरलेले दहशतवादी जैश-ए-मोहम्मद याच संघटनेचेच आहेत. हे सर्व दहशतवादी आदिल अहमद डार याचेच सहकारी असल्याची माहिती मिळते आहे.

 
जैश-ए-मोहम्मदचा कमांडर अब्दुल रशीद गाझी याने या हल्ल्यासाठी आयईडी स्फोटांचे ट्रेनिंग दिले होते. तो आयईडी स्फोटांचा एक्स्पर्ट असल्याची चर्चा आहे.  9 डिसेंबर2018ला तो पाकिस्तानातून काश्मीरमध्ये दाखल झाला होता. जैश-ए-मोहम्मद या दहशदवादी संघटनेने काश्मीरमध्ये सुरू केलेल्या कॅम्पमध्ये गाझी हा प्रमुख ट्रेनर होता. तो काश्मीरमध्ये घुसल्याचे कळताच सुरक्षा संस्थांनी अ‍ॅलर्ट जारी केला होता. गाझी हा ‘जैश-ए-मोहम्मद’चा टॉप ट्रेनर आहे. तो यापूर्वी अफगाणिस्तानातील तालिबानी अतिरेकी संघटनांमध्येही होता. तसेच पाकव्याप्त काश्मीरमध्ये चालणा-या दहशतवाद्यांच्या ट्रेनिंग कॅम्पमध्ये तो प्रमुख होता आणि नव्याने संघटनेत दाखल झालेल्यांना ट्रेन करण्याची प्रमुख जबाबदारी त्याच्यावरच होती.