पुन्हा एकदा दिसला मुख्यमंत्र्यांमधला डॉक्टर!

0
2367

गोवा खबर :मुख्यमंत्री प्रमोद सावंत हे पेशाने डॉक्टर आहेत.मुख्यमंत्री म्हणून कामत व्यस्त असताना आपला वैद्यकिय पेशा सांभाळू शकले नाही तर त्यांनी आपल्यातील डॉक्टर अजुन देखील जीवंत ठेवला आहे.आज खांडेपार येथे एका अपघातग्रस्त दुचाकी चालकाला मुख्यमंत्र्यांनी तातडीने उपचार मिळावेत यासाठी तातडीने रुग्णवाहिका मागवून त्याला हॉस्पिटल मध्ये पोचवण्याची देखील व्यवस्था केली.
मुख्यमंत्री प्रमोद सावंत संजीवनी सहकारी साखर कारखान्या संदर्भातील समस्या जाणून घेण्यासाठी जात असताना खांडेपार पूलावर एक दुचाकी चालक अपघातग्रस्त होऊन रस्त्यावर रक्ताच्या थारोळ्यात पडलेला दिसला.
मुख्यमंत्री सावंत यांनी आपल्या गाडयांचा ताफा थांबवून अपघातग्रस्त दुचाकी चालकाची आस्थेने चौकशी केली. त्यानंतर अपघातग्रस्त दुचाकी चालकाला तातडीने उपचार मिळावेत यासाठी रुग्णवाहिका मागवून त्यातून त्याला जवळच्या हॉस्पिटल मध्ये पोचवण्याचे निर्देश त्यांनी दिले.
यापूर्वी देखील दोन वेळा रस्त्यात अपघातग्रस्त चालकांना मुख्यमंत्र्यांनी आपला ताफा थांबवून आवश्यक ती मदत उपलब्ध करून दिली होती.त्यांच्या या कृतीचे सगळी कडून स्वागत केले जात आहे.