पुण्यात 28 ते 30 सप्टेंबर दरम्यान पराक्रम पर्व साजरे होणार

0
1173

गोवा खबर:नियंत्रण रेषेपलिकडच्या दहशतवादी तळावर सर्जिकल स्ट्राईक अर्थात लक्ष्यभेदी हल्ल्याच्या द्विवर्षपूर्तीनिमित्त आणि लष्कराच्या शौर्याचे दर्शन घडवण्यासाठी भारतीय लष्कर 28 ते 30 सप्टेंबर या काळात “पराक्रम पर्व” साजरे करणार आहे.

दहशतवादी कारवायांना आळा घालण्यासाठी आणि देशात शांततापूर्ण वातावरण राखण्यासाठी भारतीय लष्कराने 2016 मध्ये लक्ष्यभेदी हल्ला केला होता.

देशातल्या सर्व महत्वाच्या लष्करी ठाण्यांवर आणि छावणी परिसरात पराक्रम पर्व निमित्त कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहेत.

पराक्रम पर्वाचा भाग म्हणून पुण्यात कॅम्पमध्ये गोळीबार मैदानात शस्त्रास्त्रांचे प्रदर्शन भरवण्यात येणार आहे. 28 ते 30 सप्टेंबर दरम्यान भरवण्यात येणारे हे प्रदर्शन सकाळी दहा ते संध्याकाळी सहा वाजेपर्यंत जनतेसाठी खुले राहील. या तीनही दिवशी संध्याकाळी सहा ते सात या वेळेत याच ठिकाणी लष्कराच्या बॅन्डची धूनही ऐकण्याचा आनंद पुणेकरांना घेता येणार आहे. पराक्रम पर्वात सहभागी होण्यासाठी सर्व पुणेकरांना आवाहन करण्यात आले आहे.