पुजाराचे श्रीलंकेत सलग तिस-या कसोटीत शतक

0
1068
कोलंबो- कोलंबो कसोटीत भारताने ७० षटकात ३ बाद २७१ धावा केल्या आहेत. चेतेश्वर पुजारा (१०४) आणि अजिंक्य रहाणे (५८) खेळत आहेत. सलामीवीर शिखर धवन ३७ चेंडूत ५ चौकार आणि १ षटकारासह झटपट ३५ धावा काढून बाद झाला. दिलरूआम परेराने त्याला पायचित केले. लोकेश राहुल ८२ चेंडूत ८ चौकारासह ५७ धावा काढून धावबाद झाला. कर्णधार विराट कोहली केवळ १३ धावांवर हेराथच्या गोलंदाजीवर बाद झाला. आज पुजाराने ३४ धावा करताच चार हजार धावांचा टप्पा ओलांडला. सोबत त्याने शतक ठोकले.पुजाराने १६५ चेंडूत १० चौकार आणि १ षटकारासह शतक ठोकले. दुसरीकडे रहाणेंने ६८ चेंडूत ६ चौकारासह अर्धशतक ठोकले.