पियाजीओ व्हेइकल्स’चे  गोव्यात दोन शोरूम सुरू 

0
975
गोवा खबर: पियाजीआे व्हेइकल्स प्रा. लि., कंपनीने आपल्या आयकॉनिक “व्हेस्पा’ आणि “स्पोर्टी एप्रिलिया’ या उत्पादनांच्या विक्रीसाठी गोव्यात दोन ठिकाणी वितरक नेमल्याचे जाहीर केले आहे. कंपनीचे मडगाव आणि डिचोली येथे हे दोन नवे शोरूम सुरू करण्यात आले असून या शोरूममध्ये “व्हेस्पा’ आणि “एप्रिलिया एसआर’ मालिकेतील विविध उत्पादनांसाठी खास सवलत उपलब्ध करून देण्यात आली आहे.
कंपनीने इटालियन परंपरेला शोभेल अशी आकर्षक मांडणी 1700 चौरस फूट व 1000 चौरस फूट जागेतील या नवीन शोरूममध्ये केली आहे. उत्कृष्ट ग्राहक सेवा आणि दर्जात्मक उत्पादन हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून कंपनीने वितरकांना गोव्यात अधिकाधिक ग्राहक मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले आहेत.
यावेळी पियाजीओ इंडिया कंपनीचे सीईओ व व्यवस्थापकीय संचालक श्री. डिएगो म्हणाले, की. ग्राहकांना अतिशय उत्कृष्ट अशी ग्राहक सेवा उपलब्ध करून देण्यात येणार असल्याने नवीन वितरक “व्हेस्पा’ आणि “एप्रिलिया’ ब्रॅंडच्या उत्कृष्ट शैलीमुळे आपल्या ग्राहकांना समाधान देण्याच्या वाटचालीत यशस्वी ठरतील.
पियाजीओ कंपनीच्या सहकार्याने आणि त्यांच्या जागतिक दर्जाच्या उत्पादनामुळे आपल्या ग्राहकांना आम्हाला चांगली सेवा व चांगले उत्पादन देण्याची संधी मिळाल्याचा अभिमान आहे. कंपनीच्या उत्कृष्ट उत्पादन आणि ग्राहक सेवेद्वारे आम्हाला आमच्या ग्राहकांना खास करून युवा पिढीला चांगल्या उत्पादनाबरोबरच अतिशय उच्च दर्जाची सेवा देण्याचे समाधान मिळणार आहे, असे यावेळी के. एन. मोटोटेक या शोरूमचे श्री. मांगिरीश आणि एस. पी. के. ऑटोलिंक शोरूमचे श्री. प्रसाद यांनी सांगितले.
पियाजीओ कंपनीचे व्यवसाय प्रमुख (दुचाकी) आशिष याखमी यांच्या हस्ते या दोन्ही शोरूमचे उद्‌घाटन करण्यात आले.
वितरकांचा पत्ता 
के. एन. मोटोटेक
संपर्क क्र. 9822126964
साईदीप इमारतीचा तळमजला, बी. एच. देसाई रोड, कालकोंडा, मडगाव – गोवा.
एसपीके ऑटोलिंक 
संपर्क क्र. 9890065098
पत्ता – एसपीके ऑटोलिंक, आधार हॉस्पिटलजवळ, सर्वण, डिचोली – गोवा.