पियाजियो इंडियाचे भारतात प्रथमच वेस्पा पर्यटन

0
968
स्टायलिश वेस्पावरुन गोव्यातील न पाहिलेल्या ठिकाणांचा शोध
गोवा खबर: पियाजियोचे गोव्यातील वितरक के. व्ही. मोटोटेक यांच्या संयुक्त विद्यमाने पियाजियो इंडिया कंपनीने गोव्यातील आपल्या पहिल्याच वेस्पा पर्यटनास प्रारंभ केला आहै. या पर्यटनातील सहभागींना निसर्गरम्य आणि शांत रस्त्यावरून गोव्यातील न पाहिलेली विशिष्ट अशी निसर्ग सुंदर ठिकाणे स्टायलिश वेस्पावरुन पाहण्याची संधी कंपनीने उपलब्ध करून दिली आहे.
आजपर्यंत कधीही आयोजित न झालेल्या अशाप्रकारच्या या पर्यटनाला पियाजियो कंपनीचे दुचाकी व्यवसाय प्रमुख श्री. आशिष याखमी यांनी के. व्ही. मोटोटेकचे मालक श्री. मांगिरीश कुंदे यांच्या उपस्थितीत झेंडा दाखवून प्रारंभ केला. वेस्पा दुचाकीवरील सुखदायी प्रवासाचा आनंद घेत गोव्याच्या निसर्गरम्य पर्यटनाचा आस्वाद घेण्याची संधी सहभागींना उपलब्ध करून देण्यात आली आहे.
भारतीयांबरोबरच परदेशी पर्यटकांसाठी गोवा हे एक अतिशय लोकप्रिय ठिकाण आहे.  या पर्यटकांपैकी सर्रासपणे अनेकजन माहीत असलेल्या ठिकाणांना भेटी देतात. मात्र, सहभागींना व्हेस्पा दुचाकी चालवण्याचा आनंद घेत विशिष्ट अशा न पाहिलेल्या ठिकाणांना भेट देत गोव्याच्या खऱ्या स्थानिक परंपरेचे दर्शन घडवण्याचा या पर्यटन आयोजनामागचा कंपनीचा उद्देश आहे.
अगदी खिशाला परवडेल अशा दरात गोव्यातील आकर्षक पर्यटन स्थळांचा शोध घेण्याची संधी कंपनीने उपलब्ध करून दिली आहे. केवळ 2000 रूपयात ही पर्यटन मोहीम आयोजित केली असून यासोबत सहभागींना सोबत अनुभवी मार्गदर्शक, खास गोमंतकीय जेवण आणि वेस्पाच्या साथीने हेल्मेट, पेट्रोलही देण्यात आले. या पर्यटन मोहिमेन्तर्गत बेतुल मच्छीमार धक्का, बेतुल किल्ला, तळपण समुद्रकिनारा चिणचनी गाव अशा निसर्गरम्य ठिकाणांना भेटी देण्यात आल्या.