पालवी फाऊंडेशन  च्या वतीने   कर्करोग जनजागृती कार्यक्रम संपन्न 

0
1048

 मणिपाल हॉस्पिटलचे कर्करोग तज्ज्ञ डॉ शेखर साळकर यांनी केले मार्गदर्शन 

गोवाखबर:  कर्करोगाविषयी समाजात जनजागृती व्हावी यासाठी पालवी फाऊंडेशन या सेवाभावी संस्थेच्या वतीने गुरूवारी पणजी येथे कर्करोग जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी मणिपाल हॉस्पिटलचे कर्करोग तज्ज्ञ डॉ शेखर साळकर यांनी उपस्थित व्यक्तींना मार्गदर्शन केले. यावेळी त्यांनी स्तनाचा कर्करोग व त्यासाठी  घ्यावयाची काळजी ह्याविषयी मोलाचे मार्गदर्शन केले.

 समाजात कर्करोगाविषयी असलेली भीती व न्यूनगंड कशाप्रकारे दूर करावा व त्यासाठी  आवश्यक  असलेले त्वरित निदान व उपचार याची विस्तृत माहिती त्यांनी यावेळी दिली, तसेच आपल्या मार्गदर्शनात त्यांनी येत्या काळात पालवी फाऊंडेशन सोबत कर्करोगाविषयी मोठ्या प्रमाणात जनजागृती व्हावी यासाठी आपण नेहमी मदत करण्यास  तत्पर असल्याचे सांगितले.कार्यक्रमात उपस्थितानानी कर्करोग उपचार पद्धतीबद्दल  विचारलेल्या शंकाचे त्यांनी निरसन केले.

आगामी काळात  व्यापक स्वरूपात कर्करोग जनजागृती व मार्गदर्शन कार्यक्रम आयोजित करणार असल्याचे पालवी फाऊंडेशन च्या वतीने सांगण्यात आले.  या कार्यक्रमाला   सत्तर हुन अधिक   महिला, पुरुष व या संस्थेचे प्रमुख मान्यवर उपस्थित होते.