पाच वर्षानंतर मोदी पंतप्रधान नसणार हे शहा यांनी मान्य केले:चोडणकर

0
1506
गोवा खबर:गृहमंत्री अमित शाह यानी आज राज्यसभेत बोलताना पाच वर्षानंतर नरेंद्र मोदी यांना एसपीजी सुरक्षा कवच मिळणार नसल्याचे सांगुन, पंतप्रधान पदावर ते राहणार नसल्याची स्पष्ट कबुली देत लोकांना दिलेली आश्वासने पुर्ण करण्यास भाजप सपकार अपयशी ठरल्याचे मान्य केले आहे. केवळ जुमल्यांच्या आधारावर देश चालवता येत नसल्याचे भाजपला पटले आहे,अशी टिका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी प्रसिद्धि पत्रकाद्वारे केली आहे.
लोकांना खोटी आश्वासने देऊन भाजप सरकार सत्तेवर आले होते. काळा पैसा परत आणणार, प्रत्येकाच्या खात्यात १५ लाख टाकणार, दाऊद इब्राहिमच्या मुसक्या आवळुन त्याला भारतात आणणार, डिमोनेटायझेशन नंतर आतंकवाद व अतिरेकी कारवाया पुर्णपणे थांबणार, घाईगडबडीत लागु केलेल्या जिएसटीनंतर देशाची अर्थव्यवस्था जगात मजबुत होणार अशी अनेक खोटी आश्वासने देत भाजपने अच्छे दिनचे स्पप्न लोकाना दाखवले. पण प्रत्यक्षात एका मागुन एक संकटे तयार करुन लोकांची झोपच उडवीली,असल्याचा आरोप देखील चोडणकर यांनी केला आहे.
देशाची अर्थव्यवस्था डबघाईस आली असुन, बरोजगारी वाढत आहे. देशाच्या विकास दराने निच्चांक गाठला आहे,याकडे लक्ष वेधत चोडणकर म्हणतात,आज राज्यसभेत अमित शहानी केलेल्या जाणीवपुर्वक वक्तव्याचे प्रत्येक भारतीय स्वागतच करणार आहेत. नरेंद्र  मोदींची एसपीजी कवचातुन लवकरात लवकर सुटका होवो, अशी प्रार्थना देशातील शेतकरी, बॅंक घोटाळ्यात पैसे अडकलेले खातेदार व देशाचा स्वाभिमानी नागरीक करणार आहेत.
भाजपच्या मोदी सरकारने देश विदेशात केवळ आपल्या प्रसिद्दीसाठी करोडो रुपयांचा चुराडा केला आहे. पुतळे उभारणे, बुलेट ट्रेन सारखे न परवडणारे प्रकल्प उभारणे अशांवर भर देताना, अर्थव्यवस्था व देशाचा विकासदर मारुन टाकला आहे,असा आरोप देखील चोडणकर यांनी केला आहे.