पाक सरकारच्या वेबसाइटवर चक्क भारताचे राष्ट्रगीत

0
1082

पाकिस्तान सरकारची अधिकृत वेबसाइट अज्ञात हॅकरने हॅक केली असून त्यावर भारताचे राष्ट्रगीत आणि भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा पोस्ट करण्यात आल्या असल्याचे वृत्त पीटीआयने दिले आहे.चार महिन्यांपूर्वीच एका पाकप्रेमी हॅकर ग्रुपने भारतातील नामवंत शैक्षणिक संस्थांच्या वेबसाइट हॅक केल्या होत्या. आयआयटी दिल्ली, आयआयटी वाराणसी, अलीगड मुस्लिम विद्यापीठ आणि दिल्ली विद्यापीठाच्या वेबसाइटना हॅकर्सनी लक्ष्य केले होते. या वेबसाइट्सवर भारतविरोधी मजकूर पोस्ट करण्यात आला होता. त्यानंतर आता हॅकर्सनी थेट पाकिस्तान सरकारच्या अधिकृत वेबसाइटलाच लक्ष्य करून झटका दिला आहे.