पाकिस्तानच्या गोळीबारात औरंगाबाद जिह्यातील जवान शहीद

0
949

 

गोवाखबर :नियंत्रण रेषेवरील  पाकिस्तानच्या गोळीबारात महाराष्ट्रातील एका जवानाला वीरमरण आले आहे.पाकिस्तानाकडून राजौरी परिसरात काल करण्यात आलेल्या गोळीबारात महाराष्ट्रातील जवान किरण थोरात यांना वीरमरण आले आहे.

किरण थोरात हे औरंगाबाद जिह्यातील वैजापूर येथील रहिवासी आहेत.जम्मू-काश्मीरमधील नियंत्रण रेषेवर पाकिस्तानकडून सातत्याने गोळीबार सुरू असून, काल पाकिस्तानने शस्त्रसंधीचे उल्लंघन करून केलेल्या गोळीबारात जवान किरण थोरात यांचा मृत्यू झाला आहे. त्यांच्या पश्चात आई-वडील,पत्नी आणि एक दोन वर्षांची मुलगी आहे.