पर्वरी येथे दिव्यांग लोकांसठी प्रशिक्षण आणि जागृती कार्यक्रम

0
687
गोवा खबर: संजय विशेष शिक्षण केंद्र, पर्वरी येथील परिषद सभागृहात आगामी लोकसभा निवडणुकीसाठी दिव्यांग लोकांना आवश्यक निवडणूक प्रक्रीया कळावी म्हणून कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
उत्त्तर गोवा लोकसभा मतदारसंघातील १११ दिव्यांग मतदार आणि २५ पालक कार्यक्रमास उपस्थित होते.
दिव्यांग व्यक्तींसाठीचे नोडल अधिकारी श्री. नारायण गाड यांनी मुख्य निवडणूक अधिकारी गोवा आणि उत्तर गोवा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीने उपस्थित दिव्यांग मतदारांचे स्वागत केले आणि दिव्यांग व्यक्तींना निवडणूक प्रक्रीया कळावी हा या प्रशिक्षणामागचा हेतू असल्याचे त्यांनी सांगितले.
श्रीमती. आर मेनका, आयएएस, जिल्हाधिकारी आणि जिल्हा निवडणूक अधिकारी उत्तर गोवा यांनी माहिती दिली की निवडणूक आयोगाने ऍक्सॅसीबल इलेक्शन (Accessible Election) ही संकल्पना मर्गी लावली असून एकही मतदार मतदानापासून वंचीत राहणार नाही यावर भर दिला आहे. निवडणूक आयोग निवडणूक प्रक्रीया सर्व समावेशक करण्याचा प्रयत्न करत आहे, म्हणजे सगळ्या विभागातील मतदारांना मतदान प्रक्रिया सोयीस्कर असेल अस त्या म्हणाल्या.
मुख्य निवडणूक कार्यालयातील नोडल अधिकारी श्री. हाजिक हे सुद्धा प्रशिक्षण कार्यक्रमाला उपस्थित होते. मास्टर ट्रेनर डॉ. शंतनू गावस यांनी मतदान केंद्रावरील मतदानाची प्रक्रिया सहभागींना समजावून सांगितली. संपूर्ण प्रक्रियेची प्रत्याक्षिकही यावेळी दाखविण्यात आले.
 सुदेश गावडे यांनी आभार मानले.