पर्वरीत 11 मे रोजी रोजगार मेळावा

0
1787

 गोवा खबर:पर्वरी येथे सुकूर पंचायत हॉलमध्ये 11 मे रोजी  रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला आहे. सकाळी 9 ते सायंकाळी 5 या वेळेत तो होणार असून त्यात सुमारे 50 कंपन्या भाग घेणार आहेत.कामगारमंत्री रोहन खंवटे यांनी पणजीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत वरील माहिती दिली.

गोव्यातील बेकारांना रोजगार मिळावा म्हणून सरका र व कामगार खाते प्रयत्नशील असून त्याचाच एक भाग म्हणून हा मेळावा घेण्यात येणार आहे. एकुण 3 रोजगार मेळावे घेण्याचे नियोजन करण्यात आले असून 11 मे रोजीचा मेळावा खंवटे यांनी जाहीर केला. त्यात सुमारे 50 उद्योग-कंपन्यांना पाचारण करण्यात आले असून 35 कंपन्या निश्चित झाल्या आहेत.  इच्छुक उमेदवारांनी किमान 5 ते 10 अर्ज तयार करून आणावेत तसेच कामगार खात्याच्या ई-मेलवर ऑनलाईन नोंदणी करावी त्यासाठी गरज पडल्यास कामगार खात्याशी संपर्क साधावा, असेही खंवटे यांनी सूचित केले आहे.

मेळाव्यानंतर दुसऱया दिवशी 12 मे रोजी त्याच ठिकाणी मेळाव्यात सहभागी झालेल्या कंपन्या उद्योगाचे एचआर मॅनेजर्सना पाचारण करण्यात आले असून त्यांची बैठक घेण्यात येणार आहे. तसेच त्यांच्यात गटवार चर्चा करण्यात येणार असून गोव्यातील बेकारांना नोकऱया कशा देता येतील, यावर विचार होणार आहे.