पर्रीकरांच्या पेट्रोल बाबतच्या दृष्टीला भाजपा सरकारने पायदळी तुडविले: प्रतिमा कुतींन्हो

0
144
सर्व कल्याणकारी योजनांचे देय देणे थांबविले, इंधनाचे दर आज पर्यंतच्या उच्चांकावर आहेत, भाजपाने पर्रिकरांच्या दृष्टीला झुगारले : आप
गोवा खबर:माजी मुख्यमंत्री स्व.मनोहर पर्रीकर यांचा वारसा नष्ट करण्यासाठी आणि केवळ राज्य लुबाडण्यासाठी कांग्रेसच्या आमदारांसमवेत बेकायदेशीर सरकारची मांडणी केल्याबद्दल आम आदमी पक्षाने आज भारतीय जनता पक्षाला फटकारले. पर्रीकर यांच्या सर्वसामान्यांसाठी असलेल्या योजनांनीच २०१२ मध्ये भाजपला सत्तेत आणले, असे प्रदेश सहसंयोजक अ‍ॅड. प्रतिमा कुतींन्हो म्हणाल्या.त्या म्हणाल्या की, आजच्या “कांग्रेस जनता पार्टी” ने या दृष्टीकोनाला पायदळी तुडवले आहे आणि गंभीर संकटाच्या वेळी गोयंकरांचा विश्वासघात केला आहे.
लाडली लक्ष्मी योजनेवरील एका वृत्तावर प्रतिक्रिया देताना कुतींन्हो यांनी, महिलांच्या लोकप्रिय योजनेबाबत सरकारच्या निराशाजनक कामगिरीबद्दल शोक व्यक्त केला.
“मागील दोन वर्षात 400 पेक्षा कमी अर्ज मंजूर झाले आहेत आणि जवळपास 24,000 अर्ज अद्याप प्रलंबित आहेत. हा दर वर्षी 2% पेक्षा कमीचा मान्यता दर आहे, म्हणून ही योजना मृत झाल्याप्रमाणेच आहे. भाजप सरकारने लाडकी लक्ष्मी योजनेला ठार मारले आणि त्याबरोबरच बालिकेचे भविष्यही, ”असा आरोप कुतींन्हो यांनी केला.
कुतींन्हो यांनीही पर्रीकरांच्या गृह आधार आणि डीएसएसएस सारख्या इतर योजनांची आठवण करून दिली आणि अनेक महिन्यांपासून लाभार्थ्यांना निधी वितरित न केल्याचा मुद्दा उपस्थित केला.
सावंत यांच्याकडे आपल्या कॅसिनो मित्रांना भेट म्हणून देण्यासाठी २७७ कोटी रुपये आहेत, परंतु महामारीच्या वेळी सामान्य माणसाला जेव्हा सर्वात जास्त आवश्यक असते तेव्हा त्याच्याकडे पैसे नसतात. यापेक्षा अधिक वाईट परिस्थिती निर्माण होण्यासाठी सावंत यांनी कोविड पीडितांना नुकसान भरपाईच्या बनावट घोषणा केल्या आहेत, हे केवळ मुख्य बातमीमध्ये झळकण्यासाठी व त्यांच्यावर होणारी टीका टाळण्यासाठी त्यांनी केले, कुतींन्हो म्हणाल्या.
कुतींन्हो यांनी आठवण करून दिली की,पर्रीकर यांनी गोव्यातील पेट्रोलवरील व्हॅट माफ करण्याचे २०१२ मधील निवडणुकीच्या वेळी दिलेले वचन पूर्ण केले होते आणि पेट्रोलची किंमत प्रति लीटर ६० रुपयांपेक्षा कमी राहिल हे सुनिश्चित केले होते.कुतींन्हो म्हणाल्या की,२०१२ च्या तुलनेत कच्च्या तेलाचे दर ३० टक्के खाली असतानादेखील आज पेट्रोलची किंमत प्रति लिटर ९५ रुपये पर्यंत पोहचली आहे.
कुतींन्हो म्हणाल्या की,२०१७ च्या विधानसभा निवडणुकीच्या मोहिमेदरम्यान भाजपाला आपच्या मोफत पाणी आणि विजेच्या आश्वासनांमुळे धोका निर्माण झाला होता आणि त्यामुळे त्यांनी जनतेला चुकीची माहिती दिली की पर्रीकरांच्या समाजकल्याण योजना सत्तेवर आल्यानंतर आपच्या माध्यमातून बंद केल्या जातील.
“आज आपण पाहतो की, भाजपनेच गोव्यातील पर्रीकरांचा वारसा संपविला आहे. दुसरीकडे, आप सरकारने केवळ सर्वांसाठी समाज कल्याणकारी योजनाच उपलब्ध केल्या नाहीत, तर त्यांना मोफत वीज, पाणी, प्रथम श्रेणीचे शिक्षण आणि आरोग्य सेवा तसेच कोविडग्रस्तांना नुकसान भरपाई आणि सर्वसामान्यांना लॉकडाऊन दरम्यान आर्थिक मदत  देखील दिली आहे. आम्ही गोव्यात हे सर्व आणि बरेच काही करू शकतो, ”कुतींन्हो म्हणाल्या.