पर्रिकर स्वतः सादर करणार अर्थसंकल्प

0
910

गोवाखबर:गेले 8 दिवस मुंबई येथील लीलावती हॉस्पिटल मध्ये स्वादू पिंडाच्या विकारवर उपचार घेत असलेले मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर अर्थसंकल्प सादर करण्यासाठी गोव्यात पोचले आहे.विशेष विमानाने ते गोव्यात दाखल झाले असून थोड्याच वेळात विधानसभेत पोचणार आहेत.गेल्या बुधवारी तब्बेत बिघडल्याने त्यांना लीलावती हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यात आले होते.तेथे पंतप्रधान नरेंद्र मोदी,उपराष्ट्रपति वैकय्या नायडू आदिनी त्यांची भेट घेऊन त्यांची विचारपूस केली होती.पर्रिकर यांनी अर्थमंत्री या नात्याने अर्थसंकल्प बनवला आहे.मात्र त्यांची प्रकृती बिघडल्याने ते अधिवेशनाला पहिले 3 दिवस उपस्थित राहु शकले नव्हते.त्यांची प्रकृती ठीक नसल्याने अधिवेशन 22 दिवसां वरुन 4 दिवसांवर आणण्यात आले होते.पर्रिकर यांच्या प्रकृती मध्ये सुधारना व्हावी आणि त्यांची तब्बेत सुधारावी यासाठी मंदिर आणि चर्च मध्ये प्रार्थना केल्या जात होत्या.आज सकाळी विशेष विमानाने पर्रिकर यांचे गोव्यात आगमन झाले असून दुपारी तें अर्थसंकल्प सादर करणार आहे.पर्रिकर परत आल्याने गोव्यात उत्साहाचे वातावरण असून उपसभापती मायकल लोबो यांनी देखील आनंद व्यक्त केला आहे.