पर्रिकर सरकारचा कारभार धर्मनिरपेक्ष:सरदेसाई

0
1052

मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांच्या नेतृत्वाखालील सरकारचा कारभार धर्मनिरपेक्ष आणि सर्वधर्म समभाव जपणारा आहे.केंद्रातील मोदी सरकारला धर्मनिरपेक्षतेच्या मुद्द्यावरुन टार्गेट करून कोणी पर्रिकर यांना पोटनिवडणुकीत पराभूत करण्याची स्वप्ने पाहत असेल तर ते साध्य होणार नाही.पर्रिकर सरकारने गोयंकारपण जपण्यासाठी सगळी पावले उचलली असून मागील सरकार ने ज्या चुका केल्या होत्या त्या सुधारून गोव्याला विकसाच्या मार्गावर नेण्यासाठी नियोजनबद्ध पद्धतीने पर्रिकर यांनी प्रयत्न चालवल्यामुळे आम्ही त्यांना विनाअट पाठिंबा दिला असल्याचे सरदेसाई यांनी स्पष्ट केले. काँग्रेसच्या जाहिरनाम्यात आमच्या सरकारच्या किमान समान कार्यक्रमाची कॉपी करण्यात आली असल्याचे सांगून सरदेसाई म्हणाले,काँग्रेस मांडवी वाचवणार असल्याच्या बाता करत असली तरी आमच्या सरकारने मांडवी नदीचे मुख्य स्रोत असलेल्या म्हादई नदीला वाचवून मोठी कामगिरी केली आहे.पर्रिकर निवडून येणार हे स्पष्ट आहे फक्त मताधिक्य किती एवढाच प्रश्न उरला असल्याचे सरदेसाई म्हणाले.
सांताक्रुझचे माजी आमदार बाबुश मोन्सेरात यांनी कॅसिनो नाही तर पार्किंग ही पणजीची महत्वाची समस्या असल्याचे सांगून आपण आपल्या समर्थकांना पर्रिकर यांना पाठिंबा देण्यास सांगितले आहे असे सांगितले.पर्रिकर यांनी सांगितले तर आपण पर्रिकर यांच्यासाठी प्रचार करण्यास तयार असल्याचे मोन्सेरात यांनी स्पष्ट केले.ताळगावच्या आमदार जेनिफर मोन्सेरात गिरीश चोडणकर यांचा प्रचार करत असल्या तरी पणजीवासीयांनी काय ठरवले आहे हे महत्वाचे असल्याचे बाबुश यांनी सांगितले.