पर्रिकर लवकर बरे होऊन पुन्हा सक्रिय होवोत:राऊत

0
1144

गोव्यात लोकसभेच्या दोन्ही जागा शिवसेना लढवणार
गोवाखबर:गोव्यात लोकसभेच्या दोन्ही जागा शिवसेना सुभाष वेलिंगकर यांच्या गोवा सुरक्षा मंच सोबत युती करून लढवणार आहे.शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्याला मान्यता दिली आहे.निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर पक्ष संघटना बळकट करण्यासाठी उद्धव ठाकरे पुढच्या महिन्यात गोव्यात येऊन कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार असल्याची माहिती शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी आज पणजी येथील पत्रकार परिषदेत दिली.
सघटनात्म बांधणीसाठी गेले 2 दिवस गोव्यात असलेल्या राऊत यांनी आज जितेश कामत यांची राज्यप्रमुख म्हणून निवड झाल्याची घोषणा केली. राऊत यांनी मनोहर पर्रिकर यांच्या पुन्हा बिघडलेल्या तब्बेती बद्दल चिंता व्यक्त करत ते लवकरात लवकर बरे होऊन पुन्हा आपल्या कामात सक्रिय व्हावेत अशा सदिच्छा दिल्या.
राऊत म्हणाले,शिवसेनेने लोकसभेच्या दोन्ही जागा गोवा सुरक्षा मंच सोबत लढवणार असून त्याची तयारी सुरु झाली आहे.पक्षप्रमुख उद्धव ठाकरे पुढच्या महिन्यात गोव्यात येऊन कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार असून त्यांच्या हस्ते पक्षाच्या नवीन कार्यालयांचे उद्धाटन केले जाणार आहे.
पर्रिकर लवकर बरे होऊन पुन्हा सक्रिय होवोत:राऊत
मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांच्या नेतृत्वाची गोव्याला गरज आहे.त्यांची तब्बेत पुन्हा बिघडल्याचे ऐकून चिंता वाटली. पर्रिकर यांनी काही काळ विश्रांती घेऊन योग्य ते उपचार करून घेऊन लवकरात लवकर बरे होण्याची गरज आहे.त्यांच्या नेतृत्वाची गोव्याला गरज आहे.बहुतेक राजकारणी कामाच्या ओघात आपल्या तब्बेतीकडे दुर्लक्ष करतात आणि त्याची किंमत त्यांना मोजावी लागते.पर्रिकर हे गोव्याच्या मोकळ्या हवेत वावरले आहेत.त्यांना दिल्ली मधील हवा मानवली नाही हे खरे.पर्रिकर यांच्या नंतर गोव्यात भाजपमध्ये दूसरे नेतृत्व तयार झाले नसल्याने आजारी असून देखील अर्थसंकल्प सादर करण्यासाठी त्यांना गोव्यात यावे लागले.