पर्रिकर यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देऊन निवडणूक लढावी-चोडणकर

0
981

काँग्रेसचा साधा कार्यकर्ता म्हणून मी निवडणूक लढवत आहे.विरोधातील मनोहर पर्रिकर हे मुख्यमंत्री आणि राज्यसभा खासदार असल्याने आमच्यातील लढत समान पातळीवर नाही.पर्रिकर यांच्यात हिम्मत असेल तर पर्रिकर यांनी मुख्यमंत्री आणि राज्यसभा खासदारकीचा राजीनामा देऊन निवडणूक लढवावी असे आव्हान काँग्रेसचे उमेदवार चोडणकर यांनी दिले. पर्रिकर म्हणतात ते खरे आहे,ते जेव्हा म्हापश्यातून पणजी मध्ये आले होते त्यावेळी त्यांना पणजीची जेवढी माहिती होती तेवढीच माहिती मला पणजीची असून आपली लढत पर्रिकर यांच्याशी नाही असे स्पष्ट करत मी पणजीच्या लोकांना जी आता पर्यन्त फसवणूक झाली ती नजरेस आणून देण्याचे काम करणार असल्याचे चोडणकर यांनी सांगितले.