पर्रिकर यांनी पूर्ण केल्या 100 संवाद बैठका

0
953

पणजी मतदारसंघातुन भाजपतर्फे पोटनिवडणूक लढवत असलेल्या मनोहर पर्रिकर यांनी आज स्वातंत्र्य दिन सोहळ्याना हजेरी लावल्यानंतरचा वेळ प्रचार करण्यासाठी दिला. सायंकाळी पर्रिकर यांनी दहीहंडीच्या कार्यक्रमांच्या ठिकाणी जाऊन गोविंदाना प्रोत्साहन दिले.14 ऑगस्ट पर्यंत पर्रिकर यांनी 100 संवाद बैठका घेतल्या असून मतदारांचा मिळत असलेला प्रतिसाद बघितला तर पर्रिकर 9 हजारच्या आसपास मताधिक्याने निवडून येतील असे माजी आमदार सिद्धार्थ कुंकळ्येकर यांनी स्पष्ट केले आहे.उपसभापती मायकल लोबो यांनी देखील प्रचारात भाग घेऊन पर्रिकर यांना मोठ्या मताधिक्याने विजयी करण्याचे आवाहन केले आहे. 2 वर्षे संरक्षण मंत्री बनल्या नंतर गोव्यापासून दुरावलेल्या पर्रिकर यांनी पणजीवासियांना भेटल्यानंतर संवाद साधत प्रचार करण्यावर भर दिला. केंद्रीय आयुष मंत्री ,माजी आमदार सिद्धार्थ कुंकळ्येकर,उपसभापती मायकल लोबो,वीजमंत्री पांडुरंग मडकईकर,जनिता मडकईकर,विश्वास कुट्टीकर,माजी आमदार कृष्णा कुट्टीकर आदी नेते पर्रिकर यांच्या प्रचारात सहभागी झाले आहेत.