पर्रिकर यांना निवडून आणा:अपक्ष आमदार

0
993

भाजप आघडी सरकारला पाठिंबा दिलेल्या 3 अपक्ष आमदारांनी आज पणजी पोटनिवडणुकीत भाजप उमेदवार मनोहर पर्रिकर यांना पूर्ण पाठिंबा असल्याचे जाहिर केले.आमदार रोहन खवंटे, गोविंद गावड़े आणि प्रसाद गावकर यांनी पत्रकार परिषदेत केली घोषणा.मनोहर पर्रिकर यांचे केंद्र सरकार मधील सगळ्या घटकांशी चांगले संबंध आहेत.त्यांच्या नेतृत्वाखाली गोव्याचा विकस होऊ शकतो यावर सगळ्याचा विश्वास असल्याने घटक पक्षांनी त्यांना भक्कम पाठिंबा दिला असल्याचे खवंटे यांनी सांगितले.पर्रिकर यांनी पूर्वीच्या सरकारच्या ज्या चुका झाल्या त्या सुधारल्या असून त्यांच्या कडून जनतेच्या खुप अपेक्षा आहेत.नुकत्याच झालेल्या विधानसभा अधिवेशनात पर्रिकर यांनी अनेक विषय निकाली काढले असल्याने त्यांना पणजीवासियांनी निवडून आणून गोव्याच्या विकसात योगदान द्यावे असे आवाहन गावड़े आणि गावकर यांनी केले.