पर्रिकर यांच्या प्रकृतीबद्दल अफवा पसरवणाऱ्यास अटक

0
1071
गोवाखबर:अमेरिकेत उपचार घेत असलेल्या मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांच्या प्रकृती बद्दल फेसबुक वरुन चूकीची माहिती पोस्ट करून अफवा पसरवणे वास्को येथील एका उद्योगपतीला चांगलेच महाग पडले आहे.केनेथ सिल्वेरा असे या उद्योगपतीचे नाव आहे.सिल्वेरा यांनी पणजी मतदार संघाच्या पोटनिवडणुकीत मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांच्या विरोधात निवडणूक देखील लढवली होती.त्यात त्यांचा पराभव झाला होता.त्यानंतर सोशल मीडिया वरुन सिल्वेरा यांनी पर्रिकर आणि भाजप आघाडी सरकार विरोधात आघाडी उघडली होती.काल त्यांनी पर्रिकर यांच्या प्रकृती बद्दल चूकीची माहिती फेसबुक वर पोस्ट करून अफवा पसरवल्या बद्दल गुन्हा अन्वेषण विभागाने सिल्वेरा यांना अटक केली.
मुख्यमंत्री पर्रिकर हे सध्या अमेरिकेत उपचार घेत असून त्यांच्या प्रकृती मध्ये सुधारणा होत आहे.आता पर्यंत 2 टप्प्यात त्यांच्यावर उपचार झाले आहेत.येत्या सोमवारी त्यांच्यावर तिसऱ्या टप्प्यातील उपचार सुरु होणार आहेत.त्यानंतर तेथील डॉक्टरांच्या सल्ल्या नंतर पर्रिकर हे गोव्यात परतणार आहेत अशी माहिती नुकतीच भाजप आमदार नीलेश काब्राल यांनी दिली होती.मे अखेरीस भाजप राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा गोव्यात कार्यकर्त्यांचा मेळावा घेणार आहे.त्यापूर्वी पर्रिकर गोव्यात परत येतील अशी शक्यता वर्तवली जात आहे.

https://m.facebook.com/story.php?story_fbid=10156668093249411&id=799199410