पर्रिकर यांचे राजकीय जहाज डूबू लागले:चोडणकर

0
981
माझ्या सारख्या साध्या उमेदवारा विरोधात प्रचार करण्यासाठी भाजप उमेदवार मनोहर पर्रिकर यांना दिग्गज मंत्री,आमदार,घटक पक्ष,केंद्रीय मंत्री,पक्षाचे पदाधिकारी, सरकारी अधिकारी अशी फौज प्रचाराच्या मैदानात उतरावे लागत आहे ते पाहता पर्रिकर यांना पराभवाची भीती वाटू लागली असून मतदार नाराज असल्याने या पोटनिवडणुकीचा निकाल धक्कादायक लागेल असा दावा काँग्रेसचे उमेदवार गिरीश चोडणकर यांनी आज पत्रकार परिषदेत केला.चोडकर म्हणाले मीरामार किनाऱ्यावर रुतुन बसलेले कॅसिनो जहाज जसे डूबत आहे तसे पर्रिकर यांचे राजकीय जहाज डूबू लागले असल्याची टिका चोडणकर यांनी यावेळी केली.
चोडणकर म्हणाले,मला निवडणूक  जिंकायची आहे पण त्याहुन महत्वाचे म्हणजे मला पणजीवासियांची मने जिंकायची आहेत.पर्रिकर यांनी 23 वर्षे पणजी आमदार म्हणून काम पाहिले,3 वेळा ते मुख्यमंत्री झाले तरी पणजी मतदारसंघात अनेकांच्या घरात आज देखील टॉयलेट नाहीत.केंद्र सरकार स्वच्छ भारतच्या बाता मारत असले तरी मुख्यमंत्र्यांच्या मतदारसंघात चित्र विदारक आहे.साध्या गोष्टी सुद्धा त्यांना करता आल्या नसल्यामुळे लोक त्यांच्यावर नाराज  असून या निवडणुकीत पर्रिकर यांना जनता घरी पाठवल्याशिवाय राहणार नाही असे चोडणकर म्हणाले.पर्रिकर पणजीत राहतात म्हणून सांगत असले तरी ते त्या पत्त्यावर पर्रिकर सापडले नाहीत याकडे चोडणकर यांनी लक्ष वेधले.