पर्रिकरांविरोधात आचारसंहिता भंगाची तक्रार

0
1032

मुख्यमंत्री तथा पणजी पोटनिवडणुकीतील भाजपचे उमेदवार मनोहर पर्रिकर यांच्या विरोधात पणजी येथील संजय सरमळकर यांनी मुख्य निवडणूक आयुक्तांकडे तक्रार करून या प्रकरणाची गोव्याच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांमार्फत चौकशी करून योग्य ती कारवाई करावी अशी मागणी केली आहे.पर्रिकर यांनी पणजी पोटनिवडणुकीचा उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी पणजी येथील महालक्ष्मी मंदिर आणि मेरी ईम्याक्यूलेट चर्चपरिसराचा गैरवापर करून आचारसंहिता भंग केला असून त्याची चौकशी करून पर्रिकर यांच्यावर योग्य ती कारवाई करावी अशी मागणी सरमळकर यांनी केली आहे.
अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी नारायण नावती यांनी सरमळकर यांनी काही सूचना केल्या असून त्याची प्रत आपल्याला प्राप्त झाली असून त्याची योग्य ती दखल घेण्यात येईल असे स्पष्ट केले.