पर्रिकरांबद्दल बोलताना गहिवरल्या लोकसभा अध्यक्षा

0
954
गोवा खबर: लोकसभेच्या अध्यक्षा सुमित्रा महाजन यांनी आज दिवंगत नेते तथा माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले.पर्रिकर यांच्या बद्दल बोलताना महाजन गहिवरुन गेल्या.

लोकसभा अध्यक्षा सुमित्रा महाजन यांनी शुक्रवारी दुपारी सव्वा एक वाजता दिवंगत मनोहर पर्रिकर यांच्या दोनापावल येथील खाजगी निवासस्थानाला भेट देऊन त्यांच्या कुटुंबियांचे सांत्वन केले.जवळपास पाऊण तास महाजन पर्रिकर यांच्या कुटुंबियां सोबत होत्या.
पर्रिकर यांच्या कुटुंबियांना भेटून आल्या नंतर पत्रकारांशी बोलताना महाजन यांचा कंठ दाटून आला.महाजन म्हणाल्या,पर्रिकर यांच्या निधना दिवशी येता आल नव्हतं.त्यामुळे आज येऊन त्यांच्या मुलांची भेट घेतली.
मनोहर पर्रिकर हे खुप जवळचे होते.वर्षानुवर्षे आम्ही एकत्र काम केल, असे सांगताना महाजन यांचा कंठ दाटून आला.त्यांनी स्वतःला सावरत त्यादिवशी आपल्याला येता आल नव्हतं.त्यामुळे आज आपण पर्रिकर यांच्या मुलांची भेट घेतल्याचे त्या म्हणाल्या.