पर्रिकरांच्या आरोग्य स्वास्थ्यासाठी पणजी चर्चमध्ये प्रार्थना

0
840

गोवाखबर:मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांच्या प्रकृतीमध्ये वेगाने सुधारणा व्हावी यासाठी प्रार्थना,होम हवन,पूजा राज्यभरात सुरुच आहेत.पणजी चर्च मध्ये काल पार पडलेल्या प्रार्थना सभेला हिंदू, मुस्लिम आणि ख्रिश्चन बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.आमदार ग्लेन टिकलो,माजी आमदार सिद्धार्थ कुंकळ्येकर,महापौर सुरेंद्र फुरतादो, नगरसेवक आणि पर्रिकर हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते.