गोवा:मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांची साधी राहणी देशात नेहमीच चर्चेचा विषय असतो.पर्रिकर पायलट सोबत ऑफिस मध्ये जातात,सध्या हॉटेल मध्ये बसून पूरी भाजी खातात याचे किस्से नेहमीच रंगत असतात.आज पणजी स्मार्ट सिटी साठी पर्यावरण पूरक वाहन व्यवस्थेसाठी एका सायकल कंपनीने बाजारात आणलेल्या गियरच्या सायकल मुख्यमंत्र्यांना दाखवण्यासाठी त्यांच्या पणजी येथील सरकारी निवास्थानी आणल्या होत्या.त्यावेळी पर्रिकर यांनी स्वतः या सायकल चालवून त्याची ट्रायल घेतली.तेथे उपस्थित असलेल्या एकाने त्याचा व्हिडिओ केला असून आता हा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.
स्मार्ट पणजी होणार सायकल सिटी
स्मार्ट सिटीमध्ये प्रदूषण होऊ नये यासाठी पणजी मध्ये सायकलचा वापर वाढेल यावर भर दिला जाणार आहे.इस्रायल मध्ये ज्या पद्धतीची सायकल स्टेशन आहेत त्याच पद्धतीची सायकल स्टेशन पणजी मध्ये उभारली जाणार आहेत.जेथे आधुनिक पद्धतीच्या सायकल उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.या सायकल्स आठवडा,महीना किंवा वर्षाचे नाममात्र भाडे आकारुन रोज वापरता येणार आहेत.हे भाडे किती असावे,सायकल स्टैंड कुठे आणि किती असावीत यावर विचार केला जात असून डिसेंबर किंवा जानेवारी महिन्यात पणजी मध्ये त्याची अंमलबजावणी केली जाणार आहे.लोक सायकलचा वापर करू लागले तर वाहतूक कोंडी कमी होणार शिवाय प्रदूषणाचे प्रमाण देखील घटणार आहे,असा विश्वास पणजीचे माजी आमदार सिद्धार्थ कुंकळ्येकर यांनी व्यक्त केला आहे.