पर्यटन हंगामाची सुरुवात ड्रग्स अतिसेवनाच्या मृत्यूने

0
1012
गोवा खबर:पर्यटनाच्या आडून ड्रग्सचा फैलाव गोव्यात मोठ्या प्रमाणात झाला आहे.उडता गोवा सारखी परिस्थिती निर्माण झाली आहे.पर्यटन हंगामाच्या सुरूवातीलाच हैदराबादच्या युवकाचा हणजुणे येथे ड्रग्सच्या अतिसेवनाने मृत्यू झाल्याने पोलिसांच्या कार्यक्षमते बाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
सत्तरी तालुक्यात काही महिन्यांपूर्वी आंतरराष्ट्रीय कॅटामाइन रॅकेटचा पर्दाफाश केंद्रीय संस्थानी केला होता.गोवा पोलिस छोटे मोठे ड्रग्स पेडलर्स पकडतात मात्र ड्रग्स माफीया अद्याप देखील पोलिसांच्या हाती लागू शकलेला नाही.
 पर्यटन हंगामाला सुरुवात होताच ड्रग्स माफीयांनी देखील आपले हात पाय पसरण्यास सुरुवात केल्याचे हणजुणे येथील घटने नंतर स्पष्ट झाले आहे.
शशांक शर्मा आपल्या मित्रां सोबत हैदराबाद येथून जीवाचा गोवा करण्यासाठी गोव्यात आला होता.शनिवारी हणजुणे येथील एका क्लब मधून डिस्को पार्टी करून आल्या नंतर त्याला अस्वथ्य वाटू लागले होते.त्यानंतर त्याला तातडीने बांबोळी येथील गोमेकॉ मध्ये हलवण्यात आले.तेथे उपचार सुरु असताना त्याचा मृत्यू झाला.
गोव्यातील किनारी भागात ड्रग्स माफीयांनी आपले जाळे विणले आहे.ड्रग्स पेडलर्स गोव्यात पर्यटक म्हणून येणाऱ्याना हेरुन आपला धंदा करत असतात.
पर्यटन हंगाम अजुन सुरु सुद्धा झाला नसताना देखील ड्रग्स माफिया सुसाट सुटल्याने पोलिसांच्या कार्यक्षमते बाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.शशांकच्या मृतदेहाचे पोस्टमार्टम झाल्या नंतर त्याचा मृत्यू नेमका कशामुळे झाला आहे हे स्पष्ट होणार असले तरी यामागे जे कोणी आहेत त्यांच्या पर्यंत पोलिस पोचणार का असा प्रश्न जनते कडून उपस्थित केला जात आहे.