पर्यटन खात्याकडून पूर्व परवानगी घेण्याचा हॉटेल्सना सल्ला

0
337

गोवा खबर: पर्यटन खात्याने गृह मंत्रालयाच्या आदेशानुसार सर्व नोंदणीकृत हॉटेल्सनी आपला व्यावसाय सुरू करण्यासाठी सदर खात्याकडून पूर्व परवानगी घेण्याचे आवाहन केले आहे.

प्रमाण कार्यवाही पध्दतीचे पालन करण्यास तयार असलेल्या नोंदणीकृत हॉटेल्सना ८ जूनपासून आपला व्यवसाय सुरू करण्याचे परिपत्रक जारी करण्यात आले आहे. अर्ज सेल्फ डिक्लेरेशन अर्जासोबत पर्यटन खात्याकडे goaonline.gov.in वर सादर करावे आणि goatourism.gov.in  या खात्याच्या संकेतस्थळावर सादर करावे.