परवा सायंकाळ पर्यंत होणार पाणी पुरवठा सुरळीत: मुख्यमंत्री

0
1052
गोवा खबर:केरये-खांडेपार येथे फुटलेली जलवाहिनी दुरुस्त करण्याचे काम युद्धपातळीवर सुरु आहे.आमचे अभियंते दुरुस्ती कामावर लक्ष ठेवून आहेत.परवा सायंकाळ पर्यंत पणजी मधील पाणीपुरवठा सूरळीत होईल,असे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी स्पष्ट केले आहे.
अग्निशमन दलाच्या ताफ्यात आलेल्या नवीन वाहनाचे झेंडा दाखवून उद्धाटन केल्या नंतर मुख्यमंत्री बोलत होते.
दरम्यानच्या काळात बांधकाम खात्यातर्फे टँकरने पाणी पुरवठा केला जात आहे.कोणी  चिंता करण्याची गरज नाही.बांधकाम खात्याशी संपर्क साधल्या नंतर टँकर उपलब्ध करून दिला जाणार आहे,असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.
केरये-खांडेपार येथे गुरुवारी जलवाहिनी फुटल्या नंतर तिसवाडी आणि फोंडा तालुक्यातील पाणीपुरवठा ठप्प झाला आहे.बांधकाम खात्याच्या टँकर मधून सगळीकडे पाणी पुरवठा केला जात आहे.पिण्यासाठी लोक बाजारातून बॉटल बंद पाणी खरेदी करणे पसंत करत आहेत.