परप्रांतीय रुग्णांना उपचार शुल्क लागू

0
1005

गोवा खबर :परप्रांतीय रुग्णांकडून आज पासून गोव्यातील सरकारी हॉस्पिटल्समध्ये उपचार शुल्क आकारण्यास सुरुवात झाली आहे.याचा सर्वाधिक फटका सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रुग्णांना बसणार आहे.सिंधुदुर्ग जिल्ह्यात अद्ययावत उपचार सुविधा नसल्याने बरेच रुग्ण गोव्यात येऊन येथील सरकारी हॉस्पिटल्स मध्ये उपचार घेणे पसंत करतात.आज 24 टक्के परप्रांतीय रुग्णांना एडमिट करून त्यांच्यावर उपचार सुरु करण्यात आले.ओपीडी मध्ये 19 टक्के रुग्णांवर उपचार करण्यात आले असून त्यातून गोवा सरकारला 2 लाख 70 हजार रूपयांचा महसुल प्राप्त झाला आहे.