परदेशी पर्यटकांनी घाबरून जाऊ नये, गोवा पूर्णपणे सुरक्षित पर्यटनमंत्री मनोहर आजगांवकर

0
874
गोवा: पर्यटन मंत्री मनोहर आजगांवकर यांनी आज देशांतर्गत तसेच परदेशी पर्यटकांसाठी गोवा हे अतिशय सुरक्षित पर्यटन स्थळ असल्याचे स्पष्ट केले. राज्यातील कायदा गोव्यात येणाऱ्या पर्यटकांचे रक्षण करण्याइतपत कडक असल्याचेही ते म्हणाले.
गोव्याला भेट देणाऱ्या काही पर्यटकांच्या देशांना इथल्या सुरक्षिततेबाबत असलेल्या काळजीबद्दल  आजगांवकर म्हणाले, ‘राज्याला भेट देणारे पर्यटक सुरक्षित राहातील याची पूर्ण खबरदारी गोव्याने घेतली आहे. पर्यटकांची सुरक्षितता राखण्यासाठी आणि त्यांना सुरक्षितपणे आपल्या सुट्टीचा पूर्ण आनंद घेता यावा यासाठी आवश्यक ती पावले उचलण्यात आली आहेत.’
‘पर्यटन खात्याची जबाबदारी स्वीकारल्यापासूनच मीराज्यातील पर्यटनाशी संबंधित कायद्यांचे पूर्ण आणि काटेकोरपणे पालन झाले पाहिजे याची खबरदारी घेतली आहे,’ असेही  आजगांवकर म्हणाले.
‘किंबहुना युके परदेशी कार्यालयाने आपल्या पर्यटकांसाठी जारी केलेली पर्यटनविषयक सूचनावली प्रत्येक पर्यटकाने पालन करण्यासारखीच आहे, असे मला वाटते.’
सर्व पर्यटकांनी विविध ठिकाणी भेट देताना नियमांचे पालन करायला हवे आणि कोणत्याही प्रकारच्या बेकायदेशीर उपक्रमात सहभागी होता कामा नये असेही पर्यटन मंत्र्यांनी स्पष्ट केले. ते पुढे म्हणाले, की परदेशात प्रवास करताना सुरक्षित सुट्टीचा आनंद घ्यायचा असेल, तर भारतीय नागरिकांनाही तेथील कायद्यांचे पालन करणे बंधनकारक आहे.
‘गोव्यातील पर्यटकांची संख्या दरवर्षी वाढत आहे हे लक्षात घेऊन आम्हीपर्यटकांसाठी असलेल्या सुरक्षा व्यवस्थेचा नियमितपणे आढावा घेतो. पर्यटकांची संख्या २००६ मधील दोन मिलियन्सवरून सहा मिलियन्सवर गेली असून त्यात परदेशी तसेच देशाअंतर्गत पर्यटकांचा समावेश आहे. आमचे पर्यटक पोलिस, स्थानिक पोलिस अधिकारी, आयआरबी दल, जीवरक्षक पर्यटकांची काळजी घेण्यासाठी अहोरात्र सज्ज असतात.’
आजगांवकर यांनी परदेशी पर्यटकांना घाबरून न जाण्याचे आवाहन केले. गेल्या काही वर्षांत गोव्याने तेथील सुरक्षित नाइटलाइफसाठी विविध पुरस्कार जिंकले असून त्यात बेस्ट स्टेट फॉर लीझर अँड रिलॅक्सेशन, बेस्ट फॅमिली हॉलिडे डेस्टिनेशन यांचा समावेश असल्याचा त्यांनी पुनरूच्चार केला. गोव्याने सुरक्षित पर्यटन स्थळ असल्याची स्थान तयार केल्यामुळेच हे पुरस्कार प्राप्त झाल्याचेही ते म्हणाले.