परदेशातील गोमंतकीयांचा अपमान करणारे वक्तव्य भाजपने त्वरीत मागे घेऊन माफी मागावी : दिगंबर कामत

0
155

 

गोवा खबर: परदेशात वास्तव्यास असलेल्या प्रत्येक गोमंतकीयास आपली मातृभूमी गोव्याचा सार्थ अभिमान आहे. विदेशात नोकरी-व्यवसाय करणारे गोमंतकीयांचे गोव्यासाठी खुप मोठे योगदान आहे. भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी विदेशातील गोमंतकीयांना बेबे असे संबोधुन त्यांचा अपमान केला आहे. भाजपने त्वरीत हे विधान मागे घेवुन त्यांची जाहिर माफी मागावी, अशी मागणी विरोधी पक्ष नेते दिगंबर कामत यांनी केली आहे. 

विदेशात वास्तव्यास असणाऱ्या गोमंतकीयांच्या गोव्याच्या हिताच्या विधायक सुचना समजुन घेणे सरकारचे कर्तव्य आहे. विदेशातील गोमंतकीयांना गोव्याच्या समस्यांवर भाष्य करण्याचा व आपले मत प्रदर्शन करण्याच्या पुर्ण अधिकार आहे असे  कामत म्हणाले.
विदेशात नोकरी-व्यवसाय करुन आपले पोट भरणारे गोमंतकीय येथे गोव्यात राहणाऱ्या  आपल्या कुटुंबियांसाठी मदतीचा हात देतात याची जाणीव सर्वांनी ठेवणे गरजेचे आहे.  गोव्याची अर्थव्यवस्था बळकट करण्यासाठी ते नेहमीच मदत करतात व विदेशी चलन मिळवीण्यास योगदान देतात हे भाजप सरकारने ध्यानात ठेवावे असे  कामत म्हणाले.
कामत म्हणाले,गोव्यातील भाजपने  विदेशातील काबाड कष्ट करुन रोजी-रोटी करणाऱ्या गोमंतकीयांच्या प्रती नेहमीच सापत्न वागणुकीचे धोरण ठेवले आहे. आज, निवृत्त झालेले दर्यावर्दी तसेच खलाशांच्या विधवांवर पेंशन मिळवीण्यासाठी सरकारकडे भिक मागण्याची पाळी भाजपने आणली आहे. भाजप नेहमीच खलाशांच्या प्रती असंवेदनशील राहिले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी विदेश दौऱ्यांच्यावेळी तेथील भारतीय डायस्पोरांसमोर भाषण करुन आपली जाहिरातबाजी करतात हे स्थानीक भाजप नेत्यांनी लक्षात ठेवावे. भाजप त्यांचा वापर केवळ राजकीय फायद्यासाठी करते का असा प्रश्न कामत यांनी विचारला आहे.