पर्रिकरांच्या प्रकृती अस्वस्थ्यामुळे अर्थसंकल्पीय अधिवेशन 3 दिवसांचे करणार?

0
849

गोवाखबर:मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांच्यावर मुंबई येथील लीलावती हॉस्पिटल मध्ये स्वादूपिंडाच्या विकारावर उपचार सुरु आहेत.पर्रिकर यांच्यावर डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचाराची गरज आहे.यापार्श्वभूमिवर सभापती प्रमोद सावंत यांनी सभागृह सल्लागार समितीची बैठक उद्या बोलावली आहे.विधानसभेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन उद्यापासून सुरु होऊन 22 दिवस चालणार आहे.मात्र मुख्यमंत्री तथा अर्थमंत्री मनोहर पर्रिकर यांची प्रकृती ठीक नसल्याने अर्थसंकल्प मंजूर करून 3 दिवसात अधिवेशन आटोपते घेण्याचा विचार सुरु आहे.सभापती उद्या होणाऱ्या सभागृह सल्लागार समितीच्या बैठकीमध्ये या विषयावर चर्चा करून निर्णय घेण्याची शक्यता आहे,अशी माहिती उपसभापती मायकल लोबो यांनी दिली आहे.
दरम्यान मुख्यमंत्री पर्रिकर यांच्या बिघडलेल्या प्रकृतीमुळे निमार्ण झालेल्या परिस्थितीवर चर्चा करून निर्णय घेण्यासाठी भाजपच्या सर्व आमदारांची उद्या सकाळी 10.30 वाजता आपात्कालीन बैठक आयोजित करण्यात आली असून त्यात अर्थसंकल्पीय अधिवेशन 22 दिवसांवरुन 3 दिवसांचे करावे अशी मागणी केली जाणार असल्याचे सुत्रांचे म्हणणे आहे.