पदव्युत्तर वैद्यकीय प्रवेशांची अंतिम तारीख वाढवण्याची केंद्रीय आरोग्य मंत्रालयाची भारतीय वैद्यक परिषदेला विनंती

0
679

गोवा खबर:विविध राज्यात सुरु असलेल्या  पदव्युत्तर वैद्यकीय प्रवेशांची अंतिम तारीख वाढवावी अशी विनंती केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने भारतीय वैद्यक परिषदेला केली आहे. ही तारीख 18 मे होती मात्र ती 31 मे पर्यंत वाढवावी असे मंत्रालयाने म्हटले आहे.

या प्रकरणी केंद्र सरकार आणि वैद्यकीय शिक्षणसंस्थांनी आरोग्य मंत्रालयाला निवेदन देत प्रवेशाची मुदत वाढवावी अशी विनंती केली होती. त्या विनंती पत्रांची प्रतही मंत्रालयाने दिली असून भारतीय वैद्यक परिषदेने या विनंतीची दखल घ्यावी असे म्हटले आहे.

या विनंतीवर निर्णय घेण्यासाठी परिषदेच्या नियामक मंडळाची आज बैठक होणार असून त्यात या संदर्भात निर्णय होणे अपेक्षित आहे.