पणजी शिमगोत्सव समितीतर्फे भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन

0
372
गोवा खबर:शिमगोत्सवा निमित्त पणजी शिमगोत्सव समितीतर्फे उद्या 10 मार्चपासून 14 मार्च पर्यंत भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.उद्या गुलालोत्सवाने त्याची सुरुवात होणार आहे.
आझाद मैदानावर आकर्षक अष्टविनायक दर्शन घडवणारे व्यासपीठ उभरण्यात आले आहे.कोरोनाच्या सावटामुळे यावर्षी गुलालोत्सव वीना छताच्या मंडपामध्ये होणार आहे.आरोग्य खात्याशी सल्ला मसलत केल्या नंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.
उद्या सकाळी 9 वाजता गुलालोत्सव सुरु होणार असून तो दुपारी 12.30 पर्यंत चालणार आहे.ऑर्केस्ट्रा ॐ बीट्सच्या तालावर थिरकत लोकांना गुलालोत्सवाचा आनंद लुटता येणार आहे.
उद्या सायंकाळी 7 वाजता ऑर्केस्ट्रा ॐकार मेलोडिजचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
11 मार्च रोजी कला चेतना वळवई निर्मित कांसुलो रिटर्न हे धमाल विनोदी कोकणी नाटक सायंकाळी 7 वाजता सादर केले जाणार आहे.
12 मार्च रोजी सायंकाळी 7 वाजता मुंबई येथील रूपेश चव्हाण निर्मित धूंद रंग नृत्याचा मध्ये 25 कलाकार नृत्याचा अनोखा कलाविष्कार सादर करणार आहेत.
13 मार्च रोजी सायंकाळी 7 वाजता निषाद निर्मित मराठी बहारदार गीतांचा सांज सूरांची हा कार्यक्रम होणार असून त्यात अभिषेक नलावडे, सिद्धि बोंद्रे आणि मालविका दीक्षित टीव्ही फेम कलाकार आपली कला सादर करणार आहेत.
15 मार्च रोजी सायंकाळी 7 वाजता सिनेस्टार पिरोज मुजावर नटरंगी अप्सरा लावंण्याची हा बेधूंद करणारा लावण्यांचा धूंद नजराणा अनुभवता येणार आहे.
14 मार्च रोजी सायंकाळी 4 वाजल्या पासून काकूलो आयलंड येथून भव्य रोमटामेळ मिरवणूकीला सुरूवात होणार आहे.
गोवा पर्यटन खात्याच्या सौजन्याने आयोजित या कार्यक्रमांना मोठ्या संख्येने हजेरी लावावी,असे आवाहन समितीचे अध्यक्ष श्रीनिवास धेंपे यांनी केले आहे.