पणजी विधानसभेची पोटनिवडणुक 19 मे रोजी

0
750
गोवा खबर : माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांच्या निधना नंतर रिक्त झालेल्या पणजी विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणुक 19 मे रोजी जाहीर झाली आहे.लोकसभेच्या शेवटच्या चरणा सोबत ही पोटनिवडणुक होणार आहे.या निवडणुकीचा निकाल बाकीच्या निवडणुकी बरोबर 23 मे रोजी जाहीर होणार आहे.
माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांचे 17 मार्च रोजी निधन झाले.त्यामुळे रिक्त झालेल्या जागेची पोटनिवडणुक आज जाहीर झाली.
22 एप्रिल रोजी निवडणुकीची अधिसूचना जारी केली जाणार आहे.29 एप्रिल पर्यंत उमेदवारी अर्ज सादर करण्याची मुदत आहे.30 एप्रिल रोजी उमेदवारी अर्जाची छाननी केली जाणार आहे.2 मे  पर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत आहे.19 मे रोजी निवडणूक होणार असून 23 रोजी निकाल जाहिर केला जाणार आहे.