पणजी येथील मेरी ईम्याक्यूलेट कन्सेप्शन चर्चचे फेस्त उत्साहात साजरे

0
776

पणजी येथील मेरी ईम्याक्यूलेट कन्सेप्शन चर्चचे फेस्त आज उत्साहात साजरे झाले. सकाळी 2 प्रार्थना सभा झाल्या.10 वाजताची मुख्य प्रार्थना सभा पार पडल्या नंतर पारंपरिक आणि धार्मिक पद्धतीने सायबीणीची चर्च चौकातून मिरवणूक काढण्यात आली.यात चर्चचे धर्मगुरु आणि ख्रिश्चन बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.त्यानंतर दिवसभर सायबीणीच्या दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली होती.दरवर्षी सायंकाळी फटाक्यांची आतषबाजी होते मात्र यंदा ती काही कारणामुळे करण्यात आली नाही.चर्च चौकात चणे आणि खाज्याची दुकाने थाटण्यात आली असून वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी चर्च चौकात भरणारी फेरी कांपाल येथे भरवण्यात आली आहे.चर्चवर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. गोवे येथील सेंट फ्रांसिस झेव्हियर अर्थात गोयच्या सायबाचे फेस्त झाले की 8 डिसेंबरला सर्वात पहिले पणजी चर्चचे फेस्त होते.त्यानंतर राज्यभरातील चर्चची फेस्त होत असतात.फेस्त असले की चणे, खाजे आणि छोट्या मोठ्या वस्तुंची दुकाने लागतात त्याला फेरी असे म्हटले जाते.