पणजी मनपा मार्केट सुरु

0
361
गोवा खबर:कोरोना लॉक डाऊनमुळे गेले 43 दिवस बंद असलेले पणजी येथील मनपा मार्केट आजपासून सुरु झाले.महापौर उदय मडकईकर यांनी सकाळी मार्केटला भेट देऊन सर्व सुरळीत सुरु आहे का याचा आढावा घेतला.

आज पासून मार्केट सुरु होणार असल्याने परवा पासून मार्केट मध्ये सॅनिटायझेशन,साफ सफाई आणि रंग रंगोटीची कामे हाती घेण्यात आली होती. मार्केटच्या मुख्य प्रवेशद्वारा समोर ग्राहकांना रांगेत राहण्यासाठी चौकोन आखण्यात आले आहेत.
मार्केट मध्ये जाण्यासाठी फक्त एकच दरवाजा उघडण्यात आला आहे.एकावेळी फक्त 50 लोकांना मार्केट मध्ये जाऊ दिले जात आहे.भाजीपाला आणि फळ विक्रेते जे आइनॉक्स रस्त्यावर बसत आहेत,त्यांना आता बसण्यास परवानगी देण्यात आली नाही.
मार्केट मधील इतर सगळी दुकाने सुरु करण्यात आली आहेत.सकाळी 8 सुरु झालेले मार्केट सायंकाळी 6 पर्यंतच सुरु असणार आहे.मार्केट मध्ये दुकानदार, कामगार आणि ग्राहकांना मास्क घालणे आणि शारीरिक दूरी राखणे बंधनकारक करण्यात आले आहे.तंबाखू खावून थूंकणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली जाणार असून पान आणि तंबाखूजन्य पदार्थ विकताना आढळल्यास त्यावर कडक कारवाई केली जाणार,असा इशारा महापौर मडकईकर यांनी दिला आहे.
26 मे पासून पुरुमेंत फेस्त
म्हापसा येथील मुख्य बाजार बंद असल्याने पुरुमेंत करणाऱ्यांची अडचण होऊ नये यासाठी 26  ते 31मे दरम्यान सीने नॅशनल रस्त्यावर पुरुमेंत फेस्त भरवले जाणार आहे.त्यासाठी ग्रामीण गोमंतकीय उत्पादकांनी उद्या पासून नाव नोंदणी करावी,जास्तीत जास्त 50 जणांना तेथे दुकान थाटण्यासाठी जागा दिली जाईल,अशी माहिती महापौर मडकईकर यांनी यावेळी दिली.