पणजी मनपा  ‘पीपल्स फ्रेंडली’ बनविणार:महापौर

0
630
 गोवा खबर:पालिका ‘पीपल्स फ्रेंडली’ बनवण्या बरोबर देशातील पहिल्या 50 महानगरपालिकांमध्ये पणजी मनपा आणून दाखवणार,असा संकल्प सलग दूसऱ्यांदा महापौरपदाची संधी मिळालेल्या उदय मडकईकर यांनी केला आहे.
पणजी महापौरपदी पुन्हा एकदा उदय मडकईकर यांची तर उपमहापौरपदी वसंत आगशीकर यांची बिनविरोध निवड झाली आहे. मनपाचे आयुक्त संजित रॉड्रिग्ज यांनी काल गुरुवारी महापौर व उपमहापौर यांच्या निवडीची घोषणा केली. दोघानीही कालच आपल्या पदाची सूत्रे हाती घेतली.
 महापौरपदी पुन्हा एकदा निवड झाल्या बद्दल मडकईकर यांनी पणजीचे आमदार बाबुश मोन्सेरात तसेच सर्व नगरसेवकांचा आभार मानले आहेत. पणजी मनपाला देशातील पहिल्या 50 महानगारपालिकांत स्थान मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार आहे. पालिका ‘पीपल्स फ्रेंडली’ बनवणार आहे. पणजीच्या लोकांची सर्व प्रशासकीय कामे वेळेवर पूर्ण केली जाणार आहेत, असे महापौर  मडकईकर यांनी महापौरपदी निवड झाल्यावर सांगितले.
 पणजी  प्लास्टिक आणि कचरामुक्त करण्या बरोबर पणजीतील लोकांना चांगल्या सुविधा पुरवण्यासाठी काम करणार आहे. शहरातील सर्व रस्त्यांचे डांबरीकरण केले जाणार आहे. पणजीच्या विकासात आमदर बाबुश मोन्सेरात, मुख्यमंत्री  प्रमोद सावंत, भाजपचे प्रदेशाध्यक्ष सदानंद तानावडे यांचे सहकार्य मिळाले असून यापुढे देखील मिळत राहिल,अशी खात्री मडकईकर यांनी व्यक्त केली.
 पणजीच्या विकासासाठी महापौरांच्या हातात हात घालून व त्यांच्या सहकार्याने काम करणार आहे. राज्यात भाजप सरकार असून मनपाही भाजपच्या ताब्यात आहे.  त्यामुळे सरकारचा मनपाला पूर्ण पाठिंबा मिळत आहे. सरकारच्या पाठींब्याने आम्ही पणजी शहराचा विकास करणार आहोत, असे उपहापौर वसंत आगशीकर यांनी सागितले.
महापौर आणि उपमहापौर निवडीची घोषणा झाल्या नंतर पणजीचे आमदार बाबूश मोन्सेरात यांनी मनपा कार्यालयात येऊन मडकईकर आणि आगशिकर यांचे अभिनंदन केले. त्यानंतर भाजप मुख्यालयात देखील दोघांचे अभिनंदन करून त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या.