पणजी मतदारसंघातून पर्रिकर 4803 मतांनी विजयी

0
1314

पणजी: पणजी मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत अपेक्षेप्रमाणे मनोहर पर्रिकर यांनी बाजी मारली.मात्र पर्रिकर यांना अपेक्षित मताधिक्य मिळवता आले नाही.पर्रिकर यांनी काँग्रेसच्या गिरीश चोडणकर यांचा 4803 मतांनी पराभव केला. पर्रिकर यांना 9862 मते पडली तर चोडणकर यांना 5059 मते पडली.गोवा सुरक्षा मंचच्या आनंद शिरोडकर यांना 220,अपक्ष केनेथ सिल्वेरा यांना 96 मते पडली.301 जणांनी नोटाचा वापर केला.