पणजी फिश मार्केट मधील गलिच्छ प्रभुदेवा इमारत बनत आहे कोविडचा हॉटस्पॉट

0
281
गोवा खबर:राजधानी पणजीत कोविडचे रुग्ण वाढू लागल्याने सर्वत्र चिंतेचे वातावरण पसरले आहे.पणजी मधील फिश मार्केट इमारत कोविडचा हॉट स्पॉट बनत चालली आहे.आजचा एक रुग्ण मिळून येथील तब्बल 16 जण कोविडग्रस्त झाल्याचे आढळून आले आहेत.आज पणजी मध्ये कोविडचे 10 नवीन रुग्ण आढळले आहेत.या इमारती मध्ये वास्तव्य करणाऱ्यांनी पणजीवासीयांची डोकेदुखी वाढवली असून तेथे राहणाऱ्यांची सखोल चौकशी पणजी मनपाने करावी,अशी मागणी होऊ लागली आहे.
लक्ष्मीकांत पार्सेकर मुख्यमंत्री असताना एका नगरसेवकाच्या तक्रारी नंतर त्यांनी स्वतः जाऊन इमारतीची पाहणी केली होती.त्यानंतर त्या इमारतीला सील ठोकण्यात आले होते.मात्र काही दिवसातच सील काढावे लागले होते.
येथील खोल्यामध्ये स्वच्छता नसून स्वच्छतागृहे देखील सामायिक आहेत.अशा परिस्थितीत तेथे वास्तव करणारे कोविडग्रस्त आढळू लागले असल्याने आरोग्य खाते,मनपा आणि पोलिसांनी याची गंभीर दखल घेऊन योग्य ती कारवाई करावी,अशी मागणी होऊ लागली आहे.