पणजी अष्टमी फेरी कला अकादमीत भरणार

0
1321

पणजी मधील मांडवी नदीच्या किनारी दरवर्षी भरणारी अष्टमीची फेरी मनपा आणि जिल्हा प्रशासनाने नियमांवर बोट ठेवून बंद पाडली होती.आज मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांनी याप्रश्नात हस्तक्षेप करत मनपा,जिल्हाधिकारी आणि संबंधितांशी चर्चा करून मांडवी तीरावरील फेरी कला अकदमी मधील दर्या संगमवर भरवण्यासाठी यशस्वी मध्यस्थी केली. त्यामुळे अष्टमीची फेरी आता कला अकादमी मधील दर्या संगमवर भरणार आहे.काल प्रशासन आणि मनपाने दांडगाई करून फेरीसाठी उभारलेले स्टॉल पोलिस बंदोबस्ता मध्ये हटवण्यास सुरुवात केली होती.त्यामुळे फेरीवाले संतप्त झाले होते.